Advertisement

ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा, राजीनामा स्वीकारण्याचे न्यायालयाचे आदेश

ऋतुजा लटके यांचा राजीनामा महापालिकेने मंजूर केला नव्हता. त्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाने हायकोर्टात धाव घेतली होती.

ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा, राजीनामा स्वीकारण्याचे न्यायालयाचे आदेश
SHARES

शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला आहे. शुक्रवारी सकाळी 11 पर्यंत ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत.

ऋतुजा लटके यांचा राजीनामा महापालिकेने मंजूर केला नव्हता. त्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाने हायकोर्टात धाव घेतली होती. न्यायालयाच्या या निर्णयाने ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे.

शिवसेना ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर आज हायकोर्टात तातडीने सुनावणी झाली. यावेळी ऋतुजा लटके यांच्या वकिलांनी युक्तिवाद करताना म्हटले की, ऋतुजा लटके यांनी राजीनामा 2 सप्टेंबर रोजी दिला. त्यानंतर 29 सप्टेंबर रोजी राजीनामा फेटाळण्यात आला.

3 ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. आम्ही नियमांनुसार मुंबई महापालिकेकडे राजीनामा सुपूर्द केला. एक महिन्याचा नोटीस पिरियड पूर्ण करायचा नसेल तर एक महिन्यांचा पगार द्यावा लागेल असे सांगण्यात आले. एक महिन्याचा पगार कोषागरात जमा केला असल्याचे लटके यांच्या वकिलाने सांगितले.

ऋतुजा लटके या महापालिकेच्या सेवेत असून एखादा कर्मचारी राजीनामा देऊन निवडणूक लढवत असेल तर काय अडचण आहे असा सवाल न्यायालयाने पालिकेला विचारला. त्यावर सविस्तर उत्तर देण्याचे निर्देशही दिले.

आता जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे आम्हाला हस्तक्षेप करावा लागत असल्याचं सांगत न्यायालयाने ऋतुजा लटके यांच्या बाजूने निकाल दिला. महापालिकेने ऋतुजा लटके यांच्या राजीनामा सकाळी 11 वाजेपर्यंत स्वीकारावा असा आदेशही न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे.

उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं अंधेरी पोटनिवडणुकीसाठी (Andheri East Bypoll 2022) ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पण त्या महापालिकेच्या सेवेत होत्या, त्यांनी 3 ऑक्टोबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. पण पालिकेने त्यांचा राजीनामा स्वीकारला नव्हता.



हेही वाचा

बनावट प्रतिज्ञापत्रांची सीआयडी किंवा सीबीआयमार्फत चौकशी करावी : नरेश म्हस्के

अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक - उमेदवारांची उमेदवारी अजूनही टांगणीला

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा