Advertisement

राज्यपालांच्या अभिभाषणाचा अनुवाद गुजरातीत, विरोधक आक्रमक


राज्यपालांच्या अभिभाषणाचा अनुवाद गुजरातीत, विरोधक आक्रमक
SHARES

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपाल विद्यासागर राव यांच्या अभिभाषणानं सुरुवात झाली. मात्र राज्यपालांचं अभिभाषण मराठी ऐवजी गुजरातीत अनुवादित झाल्याने विरोधक संतप्त झाले आणि त्यांनी राज्यपालांच्या अभिभाषणवरच बहिष्कार टाकला. 


विरोधक आक्रमक

राज्यपालांचं अभिभाषण मराठी ऐवजी गुजरातीत अनुवादित करून सरकारने मराठी भाषेचा अवमान केला आहे. मराठी विरोधी सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकून सभात्याग केला, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

विरोधकांनी विधानभवनातील शिवरायांच्या प्रतिमेजवळ सरकार विरोधी घोषणा देऊन सरकारचा धिक्कार केला. 27 फेब्रुवारी म्हणजे मराठी दिनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी ही भूमिका घेतली.

अधिवेशन कोणतेही असो पहिल्या दिवशी त्याची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होते. मात्र राज्यपालांच्या अभिभाषणात आपल्या निवेदनातील अनेक मागण्या पूर्ण होतील, अशी आशा असणाऱ्या विरोधकांनी अभिभाषण मराठीत अनुवादित नसल्याने सभागृहाचा त्याग केला आहे.


राज्यपालांच्या अभिभाषणाचा गुजरातीत अनुवाद होत होता. त्यामुळे सरकारचा निषेध म्हणून आम्ही सभात्याग केला. त्यांचं अभिभाषण मराठीत होणं किमान त्याचं अनुवादन तरी मराठीत होणं आवश्यक आहे. मराठीचा अपमान करणाऱ्या या सरकारचा धिक्कार असो. 
- धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेता, विधानपरिषद

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा