Advertisement

'डॉक्टरांना गोळ्या घालण्याची भाषा चुकीची', हंसराज अहिरांच्या वक्तव्याचा निषेध

चंद्रपूर इथल्या सरकारी रुग्णालयात सोमवारी अमृत दीनदयाल मेडिकल स्टोअरचं उद्घाटन केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांच्या हस्त झालं. त्यावेळी डॉक्टरांची अनुपस्थिती पाहून अहीर यांनी डॉक्टरांना गोळ्या घालण्याची भाषा केली होती. या विधानाचा निषेध जन आरोग्य अभियानातर्फे करण्यात आला आहे.

'डॉक्टरांना गोळ्या घालण्याची भाषा चुकीची', हंसराज अहिरांच्या वक्तव्याचा निषेध
SHARES

चंद्रपूर इथल्या सरकारी रुग्णालयात सोमवारी अमृत दीनदयाल मेडिकल स्टोअरचं उद्घाटन केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांच्या हस्त झालं. त्यावेळी डॉक्टरांची अनुपस्थिती पाहून अहीर यांनी डॉक्टरांना गोळ्या घालण्याची भाषा केली होती. या विधानाचा निषेध जन आरोग्य अभियानातर्फे करण्यात आला आहे.

काय म्हणाले केंद्रीय मंत्री?

"मी रुग्णालयात येणार हे माहीत असूनही डॉक्टर रजेवर जातात. त्यांचा लोकशाहीवर विश्वास नसेल, तर त्यांनी खुशाल नक्षलवादी संघटनेत भरती व्हावे, आम्ही त्यांना गोळ्या घालून ठार मारु".

'सामान्य जनताही कायदा हातात घेईल'

जर संबंधित डॉक्टर अधिकारी हे नियमबाह्य पद्धतीने अनुपस्थित राहिले असतील, तर त्यांच्यावर सनदशीर पद्धतीने कारवाई करण्यास माननीय मंत्री महोदयांनी सूचना द्यायला हव्या होत्या. त्याऐवजी ‘डॉक्टरांनी नक्षलवादी व्हावे, गोळ्या घालतो’ ही भाषा मंत्री-महोदयांनी वापरली. जर मंत्रीच असे बोलू लागले, तर उद्या सामान्य जनताही कायदा हातात घ्यायला आणि हॉस्पिटलवर हल्ले करायला घाबरणार नाही.

डॉ. अनंत फडके, सहसमन्वयक, जन आरोग्य अभियान

'...तर डॉक्टरांच्या मनोबलावर परिणाम'

सरकारी आरोग्य व्यवस्थेत डॉक्टर मंडळी येण्यास अगोदरच राजी नसतात. जे डॉक्टर सरकारी सेवेत आहेत, त्यांना जर मंत्री-महोदय अशा हिंसक, अतिरेकी भाषेत धमकी देत असतील, तर त्याचा डॉक्टर समूहाच्या मनोबलावर विपरीत परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही आणि भविष्यात नवीन डॉक्टर सरकारी सेवेत आणण्याच्या शासनाच्या प्रयत्नांना खीळ बसू शकते, असंही जन आरोग्य अभियानातर्फे सांगण्यात आलं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा