Advertisement

मराठा आरक्षणासाठी 31 जानेवारीला चक्काजाम


मराठा आरक्षणासाठी 31 जानेवारीला चक्काजाम
SHARES

मुंबई - आरक्षणासाठी महाराष्ट्रातला मराठा समुदाय आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणासाठी 31 जानेवारीला मुंबईत चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. हाय-वे, प्रमुख मार्ग इथे हे आंदोलन होणार आहे. फक्त मुंबईतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता हे आंदोलन सुरू होईल.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समन्वयक समितीच्या सदस्यांनी रविवारी शिवाजी मंदिरात बैठक घेतली. त्या बैठकीत आंदोलनाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. "एक पॉकेट वोट म्हणून इतर सामाजाकडे सरकारने पाहिले आहे. आता मराठा समाजाकडेही त्याच दृष्टीकोनातून पाहावे. नाहीतर मग याचा नक्कीच निवडणूक आणि राजकीय कारकिर्दीवर परिणाम होईल," असा इशारा समन्वयक नितेश देसाई यांनी दिला. "मुंबईत जिथे जिथे आमची सत्ता आहे तिथे तिथे आमचे समाजबांधव रस्त्यावर उतरणार आहेत. हे आंदोलन सरकारसाठी एक इशारा आहे," असे दिलीप जगताप यांनी स्पष्ट केले.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात शिथिलता आणावी यासह अन्य मागण्यांसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांत अनेक मोर्चे निघाले. सरकारने याची दखल घेऊन न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. पण सरकारने आरक्षणाबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी मराठा सामाजातर्फे करण्यात आली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा