Advertisement

भुजबळ पोहचले पवारांच्या भेटीला


भुजबळ पोहचले पवारांच्या भेटीला
SHARES

दोन वर्ष तुरुंगवास भोगल्यानंतर जामिनावर सुटका झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आहे. भुजबळांना जामीन मिळाल्यानंतर त्यांची शरद पवारांबरोबरची ही पहिलीच भेट आहे. भुजबळांनी शरद पवारांच्या ‘सिल्वर ओक’ या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीत आगामी निवडणुकांविषयी राजकीय चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


सर्वात पहिला फोन शरद पवारांचाच

तुरुंगात असतानाच छगन भुजबळ यांना स्वादुपिंडाचा त्रास जाणवू लागला होता. जामिनावर सुटका झाल्यानंतर त्यांना मुंबईच्या केइएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. १ आठवड्याहून जास्त दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला.

सुटकेनंतर प्रथमच त्यांनी शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. जेलमधून जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांना सर्वात पहिला फोन शरद पवारांचाच आला होता, असं भुजबळांनी सांगितलं.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा