Advertisement

राज ठाकरे म्हणजे केमिकल लोचाची केस : उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांना हात घालत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही हल्ला चढवला आहे.

राज ठाकरे म्हणजे केमिकल लोचाची केस : उद्धव ठाकरे
SHARES

शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील बीकेसीत भव्य सभा घेत आपल्या विरोधकांचा समाचार घेतला आहे. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांना हात घालत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही हल्ला चढवला आहे.

अभिनेता संजय दत्त याच्या मुन्नाभाई चित्रपटाचा उल्लेख करत ते म्हणाले आहेत की, ''मुन्नाभाई चित्रपटात त्याला गांधीजी दिसतात, तसं एकाला बाळासाहेब दिसतात, नाव न घेता त्यांनी राज ठाकरे यांच्यावर अशी टीका केली आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की, ''संजय दत्तला जसे सिनेमात गांधीजी दिसतात तशी एक केस आहे, आपल्याकडे. स्वतः ला बाळासाहेब समजायला लागतात. शाल घालतात. सिनेमात शेवटी संजय दत्तला कळतं की डोक्यात केमिकल लोचा झालाय, असे मुन्नाभाई फिरताहेत.

''आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत बोलताना ते म्हणाले आहेत की, ''आता आदित्य तिरुपतीला गेला होता, आता अयोध्येला जाईल. रामजन्मभूमीला मी जाताना शिवनेरीची पवित्र माती नेली. तेव्हा चमत्कार योगायोग म्हणा आपल्या आशीर्वादाने मी मुख्यमंत्री झालो, त्याचे भांडवल आम्ही केले नाही.''

दरम्यान, उद्धव ठाकरे म्हणाले की, ''आमचं हिंदुत्व हे गदाधारी आहे. बाकीच्यांच्या हिंदुत्व घंटाधारी आहे. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, यांचा हिंदुत्व 'गधा'धारी आहे. म्हंटल बरोबर आहे. आमचं हिंदुत्व 'गधा'धारी होत, म्हणून आम्ही अडीज वर्षांपूर्वी तुम्हाला सोडलं. आमचे जुने फोटो तुमच्यासोबत येतात, त्यावरून तुमचा गैसमज झाला असेल. मात्र आम्ही गध्याला सोडलं आहे.'' भाजपला टोला लगावत ते म्हणाले, ''गाढवानं लाथ मारायची आधी, आम्ही लाथ मारली आता बसा बोंबलत.''

पुढे ते म्हणाले की, हिंदुत्व आमचा श्वास आहे आणि मराठी आमचा प्राण आहे, हे सिद्ध करण्याची आम्हांला गरज नाही. मुंबई ही मराठी माणसाने रक्त सांडून मिळवली आहे. मुंबईचा लचका तोडण्याचा प्रयत्न केला तर तुकडे केल्याशिवाय राहणार नाहीत.



हेही वाचा

आम्ही अडीज वर्षांपूर्वीच गाढवाला सोडलं : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा