शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईतल्या बीकेसी मैदानावर जाहीर सभा झाली. जवळपास एक तास केलेल्या भाषणात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. एकंदर उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात फडणवीसांना आणि भाजपला टार्गेट केलं.
भाजपानं गेल्या रविवारी घेतलेल्या सभेत शिवसेनेला डिवचलं होतं. त्या सभेत देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावत म्हटलं होतं की, तुमचं हिंदुत्व गदाधारी नाही तर गधाधारी आहे. देवेंद्र यांनी केलेल्या या टोल्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, बऱ्याच दिवसानी मैदानात उतरलो आहे. ज्यांना महाराष्ट्र म्हणजे काय आहे हे ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी बोलाव लागत आहे. भाजपसोबत होतो तेव्हा आमचं हिंदुत्व गधाधारी होते. आता आम्ही त्या गाढवांना सोडले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, ''आमचं हिंदुत्व हे गदाधारी आहे. बाकीच्यांच्या हिंदुत्व घंटाधारी आहे. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, यांचा हिंदुत्व 'गधा'धारी आहे. म्हंटल बरोबर आहे. आमचं हिंदुत्व 'गधा'धारी होत, म्हणून आम्ही अडीज वर्षांपूर्वी तुम्हाला सोडलं. आमचे जुने फोटो तुमच्यासोबत येतात, त्यावरून तुमचा गैसमज झाला असेल. मात्र आम्ही गध्याला सोडलं आहे.'' भाजपला टोला लगावत ते म्हणाले, ''गाढवानं लाथ मारायची आधी, आम्ही लाथ मारली आता बसा बोंबलत.''
पुढे ते म्हणाले की, हिंदुत्व आमचा श्वास आहे आणि मराठी आमचा प्राण आहे, हे सिद्ध करण्याची आम्हांला गरज नाही. मुंबई ही मराठी माणसाने रक्त सांडून मिळवली आहे. मुंबईचा लचका तोडण्याचा प्रयत्न केला तर तुकडे केल्याशिवाय राहणार नाहीत
यासोबतच बाबरी विषयी ते म्हणाले की, देवेंद्रजी, बाबरी पाडली तेंव्हा तुमच वय काय होतं? ती काय शाळेची पिकनिक होती? आज मी तुम्हांला विचारतो, तुम्हीं हिंदुत्वासाठी काय केलतं? तुम्ही बाबरी पाडायला गेला नव्हता. देवेंद्र जर बाबरी पडण्यासाठी तुम्ही गेला असता तर तुमच्या वजनाने बाबरी पडली असती.
हेही वाचा