Advertisement

एकनाथ शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष, गुजरातमधून घेणार पञकार परिषद

शिवसेनेचे निष्ठावान नेते व उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजल्या जाण्या एकनाथ शिंदेंनी बंड पुकारल्यास महाविकास आघाडी सरकार कोसळू शकतं.

एकनाथ शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष, गुजरातमधून घेणार पञकार परिषद
SHARES

शिवसेनेचे निष्ठावान नेते व उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजल्या जाण्या एकनाथ शिंदेंनी बंड पुकारल्यास महाविकास आघाडी सरकार कोसळू शकतं. त्यामुळं शिवसेनेकडून आमदार शिंदे यांना सातत्याने संपर्क करण्यात येत आहे. मात्र, शिंदे यांचा फोन नॉट रिचेबल लागत आहे. त्यातच ही माहिती मिळत आहे की, आज एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेणार असून सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.

एकनाथ शिंदे हे आज दुपारी गुजरातमधून पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

गुजरातमधील सूरतमधील हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे आमदारांसह मुक्कामी असल्याचं बोललं जात आहे. एकनाथ शिंदे यांना फोनवर संपर्क केल्यानंतर गुजराती भाषेतील टोन ऐकू येत आहे. त्यामुळे ते गुजरातमध्ये असल्याची चर्चा सुरू आहे. तसंच, शिंदे यांचा मुक्काम असलेल्या मेरिडियन हॉटेलबाहेर गुजरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, राष्ट्रपती निवडणुकीसाठी शरद पवारांनी आयोजित केलेल्या बैठकीसाठी आज संजय राऊत दिल्लीला रवाना होणार होते. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या नाराजी नाट्यानंतर राऊतांनी दिल्ली दौरा रद्द करत महाराष्ट्रात थांबणार आहेत. शिवसेनेत फूट पडली असल्याच्या चर्चानंतर आता पक्ष डॅमेज कंट्रोलसाठी काय पाऊलं उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा