Advertisement

मुख्यमंत्री करणार विविध प्रकल्पांचे ई-भूमिपूजन


मुख्यमंत्री करणार विविध प्रकल्पांचे ई-भूमिपूजन
SHARES

राज्यातील शहरांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अमृत आणि नगरोत्थान अभियानाच्या माध्यमातून विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. या दोन्ही अभियानांच्या माध्यमातून राज्यातील 28 शहरांमध्ये 1 हजार 622 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे ई-भूमिपूजन समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी 13 एप्रिलला सकाळी 11.30 वाजता वर्षा निवासस्थानी होणार आहे. 

एकाचवेळी 28 विविध प्रकल्पांचा ई-भूमिपूजन समारंभ होण्याचा हा राज्यातील पहिलाच उपक्रम ठरणार आहे. अमृत अभियानातंर्गत अंबरनाथ पाणी पुरवठा योजना 13.63 कोटी, कुळगाव बदलापूर पाणीपुरवठा योजना 17.77 कोटी, नाशिक मलनिस्सारण योजना 28.79 कोटी, हिंगणघाट पाणीपुरवठा योजना 61.59, इचलकरंजी पाणी पुरवठा योजना 68.68 कोटी, अकोला पाणी पुरवठा योजना 110.82 कोटी, जळगाव पाणी पुरवठा योजना 249.16 कोटी तर यवतमाळ पाणी पुरवठा योजना फेज-1 व 2 साठी 276.28 कोटी असे 8 शहरांमधील एकूण 826.72 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे ई-भूमिपूजन होणार आहे. 

नगरोत्थान अभियानांतर्गत चिखलदरा पाणी पुरवठा योजना 3.81 कोटी, रोहा नदी सौंदर्यीकरण 6.30 कोटी, मानवत पाणी पुरवठा 8.62 कोटी, सेनगाव पाणी पुरवठा 12.87 कोटी, देवळाली प्रवरा पाणी पुरवठा 15.25 कोटी, दोंडाईचा वरवाडे पाणी पुरवठा 20.91 कोटी, सिंदखेडा पाणी पुरवठा 21 कोटी, मालेगाव उड्डाणपूल 21.72 कोटी, रहाता भुयारी गटार योजना 24.81 कोटी, रोहा भुयारी गटार योजना 28.81 कोटी, लोणावळा पाणी पुरवठा 33.49 कोटी, अहमदपूर पाणी पुरवठा 44.52 कोटी, पाचोरा भुयारी गटार योजना 56.96 कोटी, जयसिंगपूर भुयारी गटार योजना 58.96 कोटी, चांदवड पाणी पुरवठा 64.05 कोटी, जामनेर भुयारी गटार योजना 66.54 कोटी, इस्लामपूर भुयारी गटार योजना 69.42 कोटी, हिंगोली भुयारी गटार योजना 69.43 कोटी, फलटण भुयारी गटार योजना 72.70 कोटी, गडचिरोली भुयारी गटार योजना 94.37 कोटी असे 20 शहरांमधील एकूण 794.54 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचा ई-भूमिपूजन समारंभ एकाच वेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. या विविध प्रकल्पांच्या माध्यमातून राज्यातील शहरांमधील नागरिकांसाठी अनेक पायाभूत सुविधा निर्माण होणार आहे.

या कार्यक्रमाचे त्या त्या शहरांमध्ये वेब कास्टद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असून, यावेळी मुख्यमंत्री उपस्थितांशी थेट संवाद साधणार आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा