मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून संजय निरूपम यांची हकालपट्टी; मिलिंद देवरा अध्यक्षपदी


SHARE

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून संजय निरूपम यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता मिलिंद देवरा मुंबई काँग्रेसचे नवे अध्यक्ष असतील. संजय निरूपम यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरून गच्छंती केली असली तरी त्यांना उत्तर - पश्चिम मतदारसंघातून लोकसभेचे तिकीट देण्यात आलं आहे. 


पक्षांतर्गत वाद 

मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची संजय निरूपम यांची कारकिर्द वादग्रस्त ठरली आहे. मुंबई काँग्रेस अंतर्गत गटबाजीच्या राजकारणाने पोखरली असल्याचं वारंवार समोर आलं होतं. अंतर्गत वाद अनेकदा उफाळून आल्याचं दिसून आलं होतं. अखेर आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेऊन संजय निरूपम यांची गच्छंती करण्यात आली. पक्षांर्तगत वाद त्यांना भोवल्याचं बोललं जात आहे. निरूपम यांचे कट्टर विरोधक मिलिंद देवरा यांच्याकडे मुंबई काँग्रेसची धुरा सोपवण्यात आली आहे. 


उत्सुकता संपली 

अध्यक्षपद काढून घेतानाच संजय निरूपम यांना उत्तर - पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे अखेर निरूपम कोणत्या मतदारसंघातून लढणार याची उत्सुकता संपली आहे. यापूर्वी उत्तर मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढण्यास निरूपम यांनी नकार दिला होती. ते उत्तर - पश्चिम मतदारसंघातून लढण्यास इच्छुक होते. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून निरूपम लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? यावर चर्चा सुरू होती. हेही वाचा - 

उर्मिला मातोंडकर निवडणुकीच्या रिंगणात? काँग्रेसकडून तिकीट मिळण्याची शक्यता
संबंधित विषय
ताज्या बातम्या