डेंग्यू पालिकेचे अपयश?

  Mumbai
  डेंग्यू पालिकेचे अपयश?
  मुंबई  -  

  आझाद मैदान - यंदा पावसाळ्यात मोठया प्रमाणात डेंग्यूची साथ पसरल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे 'मुंबई महापालिका डेंग्यूवर नियंत्रण ठेवण्यात अकार्यक्षम ठरली आहे', असा आरोप करत काँग्रेसने आझाद मैदानात निदर्शने केली. यावेळी कुलाबातील नगरसेविका सुषमा शेखर, विनोद शेखर, काँग्रेस तालुकाध्यक्ष राजकुमार झा आणि काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. 'महापालिकेने डेंग्यूची साथ पसरल्याचे घोषित करून सामाजिक बांधिलकी जपत यावर ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात', अशी मागणी नगरसेविका सुषमा यांनी महापालिका आयुक्तांकडे केली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.