Advertisement

ठाकरे सरकारमध्ये बंगले वाटपावरून नाराजी?

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि नवनियुक्त मंत्री बाळासाहेब थोरात यांनाही बंगला मिळालेला नाही. यामुळे काँग्रेसमध्ये काही प्रमाणात नाराजी असल्याची चर्चा आहे.

ठाकरे सरकारमध्ये बंगले वाटपावरून नाराजी?
SHARES

नव्या सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराला अद्याप मुहूर्त मिळालेला नसल्याने मंत्र्याच्या बंगल्याचं वाटपही रखडलेलं आहे. त्यातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि नवनियुक्त मंत्री बाळासाहेब थोरात यांनाही बंगला मिळालेला नाही. यामुळे काँग्रेसमध्ये काही प्रमाणात नाराजी असल्याची चर्चा आहे.

शिवाजी पार्क इथं झालेल्या भव्यदिव्य शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनीही शपथ घेतली. त्यापैकी सामान्य प्रशासन विभागाने मुख्यमंत्र्यांना वर्षा बंगला, शिंदे यांना राॅयलस्टोन, जयंत पाटील यांना सेवासदन आणि भुजबळ यांना रामटेक बंगला देण्यात आला. 

हेही वाचा- फडणवीस आता ‘या’ बंगल्यात राहणार

मात्र अनुभवाने ज्येष्ठ असूनही थोरात यांना बंगला मिळालेला नाही. तर काँग्रेसचेच मंत्री नितीन राऊत यांना देण्यात आलेल्या चित्रकूट बंगल्यावर ते खूश नसल्याने पर्णकुटी हा बंगला बदलून देण्यात आला. यामुळे बंगले वाटपात काँग्रेसला डावललं जात असल्याची चर्चा आहे. 

तर दुसऱ्या बाजूला ६ पैकी ४ मंत्र्यांनी देवगिरी हा बंगला मागूनही त्यांना हा बंगला देण्यात आला नाही. मंत्रीमंडळ विस्तारात अजित पवार यांचाही समावेश होण्याची शक्यता असल्याने त्यांचा आवडता बंगला राखून ठेवण्यात आल्याचं सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या मंत्र्यांना खासगित सांगितल्याचं म्हटलं जातं. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा