Advertisement

'येथे' सरकारने चित्रपट संग्रहालय बनवावं - संजय निरुपम

चेंबूर येथील 'आर के स्टुडिओ राज्य सरकारने आपल्या ताब्यात घ्यावा आणि त्या ठिकाणी चित्रपट संग्रहालय (Film Museum) उभारावं, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे.

'येथे' सरकारने चित्रपट संग्रहालय बनवावं - संजय निरुपम
SHARES

बॉलिवूडच्या सुवर्णकाळाचा साक्षीदार असलेला आणि 'शो मॅन' राज कपूर यांचा चेंबूर येथील 'आर के स्टुडिओ आज त्यांच्या वारसदार कपूर कुटुंबाने विकण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास ७० वर्षे दिमाखात उभा असलेला हा स्टुडिओ राज्य सरकारने आपल्या ताब्यात घ्यावा आणि त्या ठिकाणी चित्रपट संग्रहालय (Film Museum) उभारावं, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे.

सदर स्टुडिओमधून मिळणारं उत्पन्न फार कमी असल्यामुळे, त्याच्या देखभालीचा खर्च वाढला आहे. तसेच नजीकच्या काळात या स्टुडिओमध्ये झालेल्या आगीच्या दुर्घटनेमुळे कपूर कुटुंबाने हा स्टुडिओ विकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या निर्णयाचा आपण आदर करतो. परंतु, असं जरी असलं तरी हा स्टुडिओ विकणे हा कपूर कुटुंबाचा आर्थिक तोट्यापेक्षा भावनिक तोटा जास्त आहे, अशी प्रतिक्रिया संजय निरुपम यांनी दिली.


'ही' सरकारची जबाबदारी

१९४८ मध्ये स्थापन केलेल्या याच स्टुडिओमधून शो मॅन राज कपूर यांनी आवारा, बरसात, बॉबी, प्रेमरोग, संगम, श्री ४२० असे सुपरहिट चित्रपट दिले. अनेक कलाकार या स्टुडिओमधून उदयास आले. अनेक कलाकारांचं आणि चित्रपट रसिकांचं भावनिक नातं या स्टुडिओशी जोडलेलं आहे. आर के स्टुडिओ हा हिंदी चित्रपटसृष्टीचा एक अमूल्य ठेवा आहे. त्याला जतन करणे ही सरकारची जबाबदारी असल्याचं निरुपम म्हणाले.


'येथे' संग्रहालय उभारा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ आमची मागणी आहे की, शासनाने हा स्टुडिओ कपूर कुटुंबियांना त्याची योग्य किंमत देऊन ताब्यात घ्यावा आणि त्या जागेवर एक चित्रपट संग्रहालय बनवावे. जेणेकरून येणाऱ्या भावी पिढीला हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाची माहिती मिळेल आणि हा ऐतिहासिक वारसा जपला जाईल, असंही निरुपम म्हणाले.


हेही वाचा -

आर.के. स्टुडिओची एनओसी रद्द, अग्निशमन दलाकडून कारणे दाखवा नोटीस

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा