विलास रुपवतेंचा काँग्रेसला रामराम

  CST
  विलास रुपवतेंचा काँग्रेसला रामराम
  मुंबई  -  

  सीएसटी - गेली अनेक वर्षे काँग्रेसमध्ये सरचिटणीसपदी सक्रीय असलेले विलास रुपवते यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याचे जाहीर केले. वरिष्ठांकडून मिळालेली आश्वासने, अपमानस्पद वागणूक आणि जातीवादाला कंटाळून पक्ष सोडल्याची माहिती रुपवते यांनी दिली. विधानपरिषदेची उमेदवारी न मिळाल्यामुळे, नक्षलसमर्थक सचिन माळी याच्या सुटकेसाठी उपोषणाला बसल्याने पक्षातील वरिष्ठांकडून खच्चिकरण करण्यात आल्याचा आरोप रुपवते यांनी केलाय. संजय निरूपम आणि अशोक चव्हाण हे दलित विरोधी असल्याची त्यांनी टीका केली. तसेच राहुल गांधी यांना आम्ही टार्गेट करणार असून, ते मुंबईत आल्यास देवदासी मुंडन करून त्यांचा निषेध नोंदवणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.