काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करणार


  • काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करणार
  • काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करणार
SHARE

दादर - 132 वा काँग्रेस स्थापना दिवस दादरच्या टिळकभवनामध्ये बुधवारी साजरा करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री वंसत पुरके आणि काँग्रेसचे पदाधिकरी हजर होते. यावेळी अशोक चव्हाण यांनी भाजपावर सडकून टीका केली. तसेच नोटाबंदीमुळे लोकांचे हाल होत आहेत त्यामुळे लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी जानेवारीपासून काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली. तसेच भाजपाकडून निवडणूका डोळ्यासमोर ठेवून उत्तर भारतीय कार्यक्रम हाती घेत असल्याचे सांगत भाजपा या समुदायाकडे वोटबँक म्हणून बघत आहे हे पूर्णपणे चुकीचे असल्याचं प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या