वरळीतल्या आंबेडकर मैदानात 'माझी माय'


वरळीतल्या आंबेडकर मैदानात 'माझी माय'
SHARES

वरळी - भारतीय संविधान सन्मान दिनानिमित्त शनिवारी 26 नोव्हेंबरला वरळीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानात 'माझी माय' या गीतांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. भाजप वरळी विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष दीपक पाटील यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यामध्ये बाबासाहेबांवर आधारित गाणी सादर करण्यात आली. या वेळी शाहीर सीमा साठे यांचीही उपस्थिती होती. मुंबई भाजपा अध्यक्ष आशीष शेलार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. या कार्यक्रमात हुतात्मा पोलीस पत्नींचा सन्मान करण्यात आला. तसंच 26 नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्यातल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

संबंधित विषय