Advertisement

जांबोरी मैदानात दहीहंडी अायोजनावरून सुनील शिंदेंची सचिन अहिर यांच्यावर 'चढाई’


जांबोरी मैदानात  दहीहंडी अायोजनावरून सुनील शिंदेंची सचिन अहिर यांच्यावर 'चढाई’
SHARES

वरळीतील जांबोरी मैदानात राष्ट्रवादीचे माजी अामदार सचिन अहिर यांच्या संकल्प प्रतिष्ठानही दहीहंडी म्हणजे समीकरणच बनले होते. पण अाता याच जांबोरी मैदानात दहीहंडीच्या अायोजनावरून शिवसेनेचे विद्यमान अामदार सुनील शिंदे यांनी 'चढाई’ केली अाहे. दहीहंडी अायोजनासाठी या दोन्ही नेत्यांनी अर्ज केला होता, त्यापैकी सुनील शिंदे यांना परवानगी देण्यात अाली अाहे.अहिर यांना परवानगी नाकारली

राष्ट्रवादीचे माजी अामदार सचिन अहिर हे गेल्या १५ वर्षांपासून वरळीच्या जांबोरी मैदानात दहीहंडी उत्सवाचं अायोजन करत असतात. गोपाळकाला मंडळांमध्येही या दहीहंडी उत्सवाचं अाकर्षण असतं. यंदाही अहिर यांनी दहीहंडी उत्सवाच्या अायोजनासाठी सर्वप्रथम अर्ज केला होता. पण त्यांना परवानगी नाकारण्यात अाली. शिवसेनेनं सत्तेचा वापर करून अापल्याकडे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला अाहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांची ही धडपड सुरू अाहे, असा अारोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केला अाहे.


शिवसेनेचंही प्रत्युत्तर

दरम्यान, शिवसेनेनं या अारोपांना दमदार प्रत्युत्तर दिलं अाहे. राष्ट्रवादीच्या अाणि अामच्या दहीहंडी काय फरक असतो, हे तुम्हाला कळेलच. लोकांच्या अाग्रहास्तव अाम्ही पारंपरिकपणे गोपाळकाला उत्सव अायोजित करत अाहोत. विशेष म्हणजे, या उत्सवातून जमा होणारा सर्व निधी हा महापूरात अडकलेल्या केरळवासीयांसाठी पाठवला जाणार अाहे, असं सुनील शिंदे यांनी सांगितलं.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा