Advertisement

शुक्रवारी सकाळी ९ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देणार मेसेज

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला एका छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून देशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. यासंबंधी ट्वीट करत मोदींनी माहिती दिली आहे.

शुक्रवारी सकाळी ९ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देणार मेसेज
SHARES

देशात कोरोनाव्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याची घोषणा केली. अशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी हे देशाला संबोधित करणार आहेत. शुक्रवारी सकाळी ९ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला एका छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून देशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. यासंबंधी ट्वीट करत मोदींनी माहिती दिली आहे.

नोटबंदी असो वा लॉकडाऊन पंतप्रधान मोदी हे नेहमी रात्री ८ वाजता देशाला संबोधित करायचे. पण यावेळी ते सकाळी ९ वाजता देशातील नागरिकांना खास मेसेज देणार आहेत. मोदी यावेळी नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

कोरोनाव्हायरसच्या उद्रेकानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासकांशी चर्चा केली. सद्य परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी महाराष्ट्र, मिझोरम, दिल्ली, बिहार, तेलंगणा, पुडुचेरी, गोवा, त्रिपुरा, उत्तराखंड, मेघालय, हिमाचल प्रदेश या मुख्यमंत्र्यांसह राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्र शासित प्रदेशांचे प्रशासक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींशी चर्चेसाठी उपस्थित होते.



हेही वाचा

पंतप्रधान मोदींनी साधला मुख्यमंत्र्यांशी संवाद

एकत्रित नव्हे, प्रत्येक महिन्याला मिळणार मोफत रेशन- छगन भुजबळ

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा