Advertisement

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केलं ट्विट, युजर्स म्हणाले 'युवराज का इंटरनेट स्लो है'

युवराजनं असं काय ट्विट केलं आणि युजर्सच्या ट्रोलला कारणीभूत बनला... वाचा सविस्तर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केलं ट्विट, युजर्स म्हणाले 'युवराज का इंटरनेट स्लो है'
SHARES

युवराज सिंहनं बुधवारी संध्याकाळी एक ट्विट केलं आणि युजर्सच्या ट्रोलला कारणीभूत ठरला. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी विराजमान होऊन जवळपास एक आठवडा होत आला. पण याची दखल घ्यायला युवराज सिंहनं थोडा उशीरच केला. त्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलेल्या एका ट्विटमुळे चांगलाच ट्रोल झाला.

युवराज सिंहनं उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याच्या शुभेच्छा बुधवारी ट्विटरवरून दिल्या. "महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल उद्धव ठाकरेजी यांंचं अभिनंदन! त्यांच्या समर्थ नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रगती करेल अशी आशा आहे." अशा अर्थाचं ट्वीट युवराज सिंहनं बुधवारी ४ डिसेंबरला संध्याकाळी ७.१५ वाजता केलं. त्यावर यूजर्सनी तू खूप लवकर जागा झालास अशा आशयाचे रिप्लाय दिले. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement