Advertisement

लहान मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्याला भर पत्रकार परिषदेत मनसेकडून चोप


लहान मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्याला भर पत्रकार परिषदेत मनसेकडून चोप
SHARES

ठाण्यात एका ३ वर्षीय मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्या एका ५३ वर्षीय परप्रांतीय व्यक्तीला स्थानिकांनी चोप दिल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमधील या व्यक्तीला सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी चक्क पत्रकार परिषदेत हजर केलं. इतकंच नव्हे तर या व्यक्तीला भर पत्रकार परिषदेत चांगलाच चोप दिला.


मनसे धडा शिकवणार

बिहार आणि यूपीतुन मुंबईत येऊन कमावणार, रहाणार आणि आमच्या लहान मुली, बहिणींवर वाईट नजर टाकणार तर हे मनसे कधीही खपवून घेणार नाही. अशा वाईट मनोवृत्तीच्या लोकांना मनसे धडा शिकवणार आणि ते करताना सध्या गुजरातमध्ये जे काही सुरू आहे तसं काही झालं तर त्याला आम्ही जबाबदार नाही, अशी प्रतिक्रिया जाधव यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.


मनसेचा इशारा

गुजरातमध्ये एका परप्रांतीयाने १४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या घटनेनंतर गुजरातमध्ये वातावरण तापलं आहे. परप्रांतीयांना जोरदार विरोध गुजरातमध्ये होत असून परप्रांतीयांवर हल्ले होत आहेत. मुंबईत तर परप्रांतीय विरुद्ध मराठी त्यातही मनसे असा वाद नेहमीच दिसून येतो. त्यातच काँग्रेसचे संजय निरुपम यांनी उत्तर भारतीयच मुंबई चालवतात असं म्हटल्यानं वाद आणखी पेटला आहे.
तर दुसरीकडे चिमुकलीशी अश्लील चाळे करणाऱ्या परप्रांतीयाला शोधून काढत मनसेने त्याला बेदम मारलं आहे. अशा नराधमांवर कडक कारवाई करा नाही तर मनसे स्टाइलने अशा लोकांना धडा शिकवायला मनसे आहे, असा इशाराही जाधव यांनी दिला आहे. दरम्यान या व्यक्तीला आता मनसेकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा