Advertisement

'हे सरकार दाऊदच्या इशाऱ्यावर चालतं'- देवेंद्र फडणवीस

हा संघर्ष देशद्रोह्यांविरोधात आहे. दाऊदच्या गुर्ग्यांविरोधात संघर्ष आहे. भारतमातेसाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांच्यासाठी हा संघर्ष आहे.

'हे सरकार दाऊदच्या इशाऱ्यावर चालतं'- देवेंद्र फडणवीस
SHARES

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीनं अटक केल्यानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपानं मुंबईत मोर्चा काढला आहे. आझाद मैदानातून या मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चापूर्वी भाजपाच्या नेत्यांनी मोर्चेकऱ्यांना संबोधित केलं. यावेळी विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस यांनी 1993 साली झालेल्या बॉम्ब स्पोटाची आठवण करून दिली. तसंच, 'हे सरकार दाऊतच्या इशाऱ्यावर चालतं', असं म्हटलं. हा संघर्ष देशद्रोह्यांविरोधात आहे. दाऊदच्या गुर्ग्यांविरोधात संघर्ष आहे. भारतमातेसाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांच्यासाठी हा संघर्ष आहे.

हे छत्रपतींचे मावळे आहेत, ते झुकणार नाहीत, वाकणार नाहीत, थकणार नाहीत, बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत व्यवहार करुन जेलमध्ये गेलेल्या नवाब मलिकांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. ही मागणी आमची केवळ राजकीय मागणी नाही. रोज घटना घडतात, पण रोज आम्ही राजीनामा मागत नाही. पण ही घटना बघितली तर लाजिरवाणी आहे. बॉम्बस्फोटातील आरोपी शहावली खान याकूब मेमनसोबत बसून बॉम्बस्फोटाचा कट केला, बॉम्बस्फोट कसा घडवायचा, स्कूटरमध्ये ठेवून बॉम्बस्फोट केले.

दुसरा सलीम पटेल दाऊदची बहिण हसिना पारकर या दोघांनी मिळून हा कट रचला. या हरामखोरांनी नवाब मलिकांना जमीन विकली, मुंबईत उकिरड्याची जागाही 25 रुपये चौरस फुटाने मिळत नाही. या हरामखोरांसोबत व्यवहार करताना तुम्हाला लाज कशी वाटली नाही. जे मुंबईकर ज्यांचे बॉम्बस्फोटत चिंधड्या उडाल्या, ज्यांचे पती मेले, बाप मेले, घरदार उद्ध्वस्त झाले त्यांचे अश्रू दिसले नाहीत का? पैशासाठी इतके आंधळे झालात का? असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नवाब मलिकांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही. काल आम्ही तुमचं पितळ उघडं केलंय. मोदींना संपवण्याकरीता तुम्ही सर्व एकत्र येता आहात. आमचे संबंधी गुन्हेगारांशी नाही. कालचा बॉम्ब पहिला बॉम्ब आहे. अजून अनेक बॉम्ब येतील. आपला संघर्ष पोलिसांशी नाही. पोलिसांनी अटक केली तर काही होत नाही. शांत राहा. यांनी राजीनामा घेतला नाही तर अजून अनेक गोष्टी बाकी आहे, अजून संघर्ष बाकी आहे. रस्ता रोको करायचा नाही. आपण दाऊदविरोधात लढतोय, मुंबईविरोधात नाहीदाऊदच्या गुंडाविरोधात हा संघर्ष आहे.

1993 साली मुंबईत 13 बॉम्बस्फोट झाले, त्यावेळी हसीना पारकर, सलीम पटेलनं षडयंत्र रचलं. मलिकांनी आरोपीकडून जमीन विकत घेतली. २५ रु चौरस फुटाने ही जमीन विकत घेतली, हसीना पारकरने बॉंम्बस्फोटाचा कट रचला. ईडीजवळ मलिकांवरोधात पुरावे आहेत. दाऊदच्या माणसाचा राजीनामा घेतलाच पाहिजे असे मागणी फडणवीसांनी केली. 

ठाकरे सरकारकडून मलिकांचा त्वरित राजीनामा घेण्यात यावा या मागणीसाठी मुंबईत विराट मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी भाजपचे प्रमुख नेते आझाद मैदानावर दाखल झाले असून त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. मोर्च्याचे नेतृत्व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करत आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा