भाजपामध्येही घराणेशाहीला ऊत ?

 Goregaon
भाजपामध्येही घराणेशाहीला ऊत ?

गोरेगाव - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपामध्ये घराणेशाही चालणार नाही असा नारा दिला होता. मात्र याला आता भाजपा मंत्र्यांनीच हरताळ फासल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यमंत्री विद्या ठाकूर आपल्या मुलाला पालिका निवडणुकीत तिकीट मिळावे यासाठी जोरदार प्रयत्न करताना दिसत आहेत. दीपक ठाकूर प्रभाग क्रमांक 50 मधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्यांना तिकीट मिळावे म्हणून विद्या ठाकूर यांनी जोर लावलाय. यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सुर उमटू लागला आहे. त्यामुळे घराणेशाहीवर टीका करणाऱ्या भाजपानेही घराणेशाहीचा कित्ता गिरवायला सुरूवात केली का? असा प्रश्न निर्माण झाला.

Loading Comments