Advertisement

संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ, ईडीकडून संपत्ती जप्त


संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ, ईडीकडून संपत्ती जप्त
SHARES

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. कराण इंडीनं संजय राऊत यांची संपत्ती जप्त केली आहे. यात अलिबागमधील ८ प्लॉट आणि दादरमधली १ फ्लॅट जप्त केला आहे.

संजय राऊतांनी मनी लाँड्रिंगमधील पैशातून संपत्ती खरेदी केली असल्याची माहिती ईडीकडून देण्यात आली आहे. तसंच, संजय राऊत आणि त्यांच्या जवळील नेत्यांवरही कारवाई करण्यात आली आहे.

१ हजार ३४ कोटींच्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीनं ही कारवाई केली. याप्रकरणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पाठपुरावा केला होता.

...तर मीच माझी संपत्ती भाजपला दान करेन -राऊत

माध्यमाशी बोलताना संजय राऊत म्हणाले, आम्ही काय प्रॉपर्टीवाले आहोत का? २००९ साली आम्ही कष्टाच्या पैशानं जमीन घेतली. त्यावेळी कुणी काही चौकशी केली नाही. आता म्हणे, मनी लाँड्रिंग प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. २००९ मध्ये घेतलेली ती प्रॉपर्टी एक एकर सुद्धा नाही. आमच्या नातेवाईकांनी स्वतःच्या कमाईनं घेतलेल्या त्या जागा आहेत.

फ्लॅटबद्दल बोलायचं झाल्यास, माझे एका मराठी माणसाचे राहते घर जप्त करण्यात आले आहे. आता भाजपवाले फटाके फोडत असतील. या प्रॉपर्टीमध्ये कुठल्याही प्रकारचे गैरव्यवहार झालेले आढळले तर मी स्वतः माझी संपत्ती भाजपला दान करेल असेही संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

भाजप नेते नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्या अटकेची मागणी केली आहे. ईडीने त्यांच्याविरुद्ध PMLA कायद्यांतर्गत कारवाई केली. अर्थातच त्यांनी भ्रष्टाचार झाला. आता त्यांना महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांप्रमाणे तुरुंगात टाकायला हवे अशी मागणी नितेश राणे यांनी केली.


हेही वाचा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे झाले आजोबा, कुटुंबात चिमुकल्याचे आगमन

ईडी अधिकाऱ्यांवरील ओरोपांची मुंबई पोलिसांकडून होणार चौकशी

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा