शेतकरी आठवडा बाजाराला सुरुवात

BMC
शेतकरी आठवडा बाजाराला सुरुवात
शेतकरी आठवडा बाजाराला सुरुवात
शेतकरी आठवडा बाजाराला सुरुवात
शेतकरी आठवडा बाजाराला सुरुवात
See all
मुंबई  -  

फोर्ट - ग्राहक आणि शेतकरी यांच्यामधील दलालांच्या लॉबीला लगाम घालण्यासाठी राज्य शासनाने शेतकरी आठवडा बाजाराला सुरुवात केली आहे. विधिमंडळ परिसरात पहिला आठवडा बाजार सुरू झाल्यांनंतर रविवारी दुसरा आठवडा बाजार फोर्ट येथील हुतात्मा चौकात सुरू करण्यात आला आहे. मुंबईचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी या आठवडा बाजाराचे उद्घाटन केले. महाराष्ट्र राज्याच्या कृषी पणन मंडळ यांच्या वतीने संत शिरोमणी सावता माळी शेतकरी आठवडा बाजार भरवला जातो. यावेळी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी उपस्थिती लावली.

पाऊस असल्यामुळे या कार्यक्रमाला इतर कोणीही मंत्री फिरकले नाही. यावेळी शेतकऱ्यांनी टोल माफ करावा, अशी मागणीही केली.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.