Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
52,69,292
Recovered:
46,54,731
Deaths:
78,857
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
38,649
1,946
Maharashtra
5,33,294
42,582

अनिल देशमुख यांना सीबीआयचं समन्स, १४ एप्रिलला चौकशी

सीबीआयने रविवारी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि सहाय्यक एस कुंदन यांची चार तास चौकशी केली.

अनिल देशमुख यांना सीबीआयचं समन्स, १४ एप्रिलला चौकशी
SHARES

सहायक पोलीस सचिन वाझे यांना १०० कोटी रुपये जमा करण्याचे टार्गेट दिले होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि सध्याचे होमगार्ड प्रमुख परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केला होता. या प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं (सीबीआय) अनिल देशमुख यांना समन्स पाठवलं आहे. सीबीआयकडून अनिल देशमुख यांची १४ एप्रिलला चौकशी करण्यात येणार आहे. 

परमबीर सिंग यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र लिहून अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेंवर मुंबईतील बार आणि हॉटेल्सचालकांकडून महिन्याला १०० कोटी  वसूल करण्याचं टार्गेट दिल्याचा उल्लेख परमबीर यांनी आपल्या पत्रात केला होता. यामुळे अनिल देशमुख अडचणीत सापडले. या प्रकरणी सीबीआयने चौकशी करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यामुळे अनिल देशमुख यांनी आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला.

सीबीआयने रविवारी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि सहाय्यक एस कुंदन यांची चार तास चौकशी केली. त्यानंतर त्यांचे स्वतंत्रपणे जबाब नोंदविण्यात आले. त्यानंतर सीबीआयकडून आता अनिल देशमुख यांनाही समन्स पाठवण्यात आला आहे. त्यांनाही चौकशीला हजर रहावं लागणार आहे.

परमबीर सिंग यांनी मुंबई हायकोर्टात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली होती. अ‌ॅड. जयश्री पाटील यांनी देखील अनिल देशमुख यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. हायकोर्टानं जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सीबीआयला प्राथमिक चौकशीचे आदेश दिले होते. तर परमबीर सिंग यांची याचिका फेटाळली होती. हायकोर्टानं अ‌ॅड. जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निर्णय देताना सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली होती. हेही वाचा - 

आणखी ३ नवी कोरोना केंद्रे लवकरच सुरू होणार

'या' वयोगटाला कोरोनाचा सर्वाधिक धोका

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा