Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
51,79,929
Recovered:
45,41,391
Deaths:
77,191
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
41,102
1,717
Maharashtra
5,58,996
40,956

आणखी ३ नवी कोरोना केंद्रे लवकरच सुरू होणार

कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढत असून, खाटा कमी पडू नयेत, यासाठी मुंबईत आणखी ३ ठिकाणी कोरोना उपचार केंद्र सुरू करण्यासाठी पालिकेनं हालचाली सुरू केल्या आहेत.

आणखी ३ नवी कोरोना केंद्रे लवकरच सुरू होणार
SHARES

कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढत असून, खाटा कमी पडू नयेत, यासाठी मुंबईत आणखी ३ ठिकाणी कोरोना उपचार केंद्र सुरू करण्यासाठी पालिकेनं हालचाली सुरू केल्या आहेत. मालाड आणि कांजूरमार्गमध्ये कोरोना केंद्र उभारण्यात येणार असून, शहर भागासाठी लवकरच जागा निश्चिात करण्यात येणार आहे.

मुंबईत फेब्रुवारीपासून कोरोनाचा पुन्हा वेगाने फैलाव सुरू झाला. गेल्या आठवड्यापासून रुग्णालयांसह कोरोना केंद्रांतील खाटा व्यापू लागल्या आहेत. दररोज १० हजारांवर रुग्णांची नोंद होत असल्याने पालिकेचे आव्हान वाढले आहे. मुंबई महानगर प्रदेशातूनही रुग्ण मोठ्या प्रमाणावर उपचारांसाठी पालिके च्या रुग्णालयांमध्ये धाव घेत आहेत. त्यामुळे खाटा वाढविण्यासाठी पालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यानुसार, कांजूरमार्ग येथे क्रॉम्पन अ‍ॅण्ड ग्रीव्हज येथे एक मोठे कोरोना उपचार केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्याचे काम सुरू झाले असून, महापौर किशोरी पेडणेकर यांनी या कामाची रविवारी पाहणी केली.

जूनपर्यंत हे केंद्र सुरू करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यातून २००० खाटा उपलब्ध होऊ शकतील. त्यात अतिदक्षता विभागाच्या २०० खाटांचाही समावेश असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पूर्व नगरात एकही करोना उपचार केंद्र नसल्यामुळे रुग्णांना मुलुंडमधील केंद्रामध्ये जावे लागते. तसेच हे केंद्र झाल्यास पालिके च्या रुग्णालयावरील भार कमी होईल, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त के ली. येत्या काळात वरळीतही खाटांची संख्या वाढवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


पश्चिाम उपनगरातही मालाडमध्ये एक करोना उपचार केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. सध्या आढळणाऱ्या रुग्णांमधील ८० टक्के रुग्ण हे इमारतींमधील आहेत. त्यात लक्षणे नसलेल्या रुग्णांना गृहविलगीकरणात राहता येते. मात्र, आता लहान घरे, चाळी, वस्त्यांमध्ये रुग्ण आढळू लागले आहेत. त्यामुळे अशा रुग्णांसाठी खाटा वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे या विभागांमध्येही खाटा वाढवण्यासाठी रिकाम्या इमारती ताब्यात घेण्यास सुरुवात झाली आहे.


दरम्यान, वरळीत नेहरू सायन्स सेंटर आणि पोद्दार रुग्णालयात ऑक्सिजन खाटांची संख्या वाढवण्यात येणार असल्याची माहिती साहाय्यक आयुक्त शरद उघडे यांनी दिली. ‘एनएससीआय’मध्येही अडीचशे खाटा वाढवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच म्हाडाच्या एका इमारतीतही ३०० खाटांचे विलगीकरण केंद्र तयार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा