भायखळ्यात गवळी गँग सक्रिय

Byculla
भायखळ्यात गवळी गँग सक्रिय
भायखळ्यात गवळी गँग सक्रिय
भायखळ्यात गवळी गँग सक्रिय
See all
मुंबई  -  

भायखळा - महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असताना भायखळ्यातील अरुण गवळीची अखिल भारतीय सेना (अभासे) देखील पुन्हा एकदा निवडणुकीसाठी सज्ज झालेली दिसत आहे. अभासेच्या प्रभाग क्र. 207 च्या नगरसेविका वंदना गवळी आणि प्रभाग क्र. 212 च्या नगरसेविका गीता गवळी या पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.

वंदना आणि गीता गवळी रविवारी सकाळपासूनच आपल्या प्रभागात प्रचार करताना दिसत होत्या. याशिवाय तिथल्या रहिवाशांच्या समस्या देखील त्या जाणून घेत आहेत. मात्र या वेळी अभासेला निवडणूक जड जाण्याची चिन्हं दिसत आहेत. कारण वंदना गवळी यांच्यासमोर प्रभाग क्र.207 मधून राष्ट्रवादीच्या सुरेखा पेडणेकर, मनसेकडून शलाका हारियन आणि भाजपाकडून सुरेखा लोखंडे या मजबूत उमेदवार रिंगणात आहेत. तर गीता गवळी यांच्या समोर समाजवादीच्या रुक्साना सईद, काँग्रेसच्या नादिया सिद्दीकी रिंगणात आहेत. असं असलं तरी वंदना आणि गीता गवळी यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केलाय.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.