Advertisement

फडणवीस काय बिंग फोडणार, त्यांना खबऱ्यांनी माहिती दिलीय- जितेंद्र आव्हाड

कोरोना मृतांच्या आकडेवारीची फेरपडताळणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: दिले होते. तेव्हा फडणवीसांच्या बिंग फोडण्याचा दाव्यांमध्ये काही तथ्य नाही, असा असं वक्तव्य राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

फडणवीस काय बिंग फोडणार, त्यांना खबऱ्यांनी माहिती दिलीय- जितेंद्र आव्हाड
SHARES

राज्य सरकारने नुकत्याच केलेल्या फेरपडताळणीत महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा १३२८ ने वाढून ५४५६ वर गेल्यामुळे विरोधकांकडून सरकारवर होणाऱ्या हल्ल्यांना बळ मिळालं आहे. सरकारने जाणीवपूर्वक आकडे लपवल्याचं सत्य अखेर बाहेर आलं आहे. त्यामुळे आकडे लपवणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी एका बाजूला विधानसभेतील विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करत असताना राज्यातील कोरोना मृतांच्या आकडेवारीची फेरपडताळणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: दिले होते. तेव्हा फडणवीसांच्या बिंग फोडण्याचा दाव्यांमध्ये काही तथ्य नाही, असा असं वक्तव्य राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

आकडेवारीत पारदर्शकता

एका वृत्तवाहिनीशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, कोरोनाच्या संकटाची इतिहासात नोंद होणार आहे. त्यामुळं काहीही लपवाछपवी करण्याचा प्रश्नच उद्धवत नाही. उलट या आकड्यांमध्ये पारदर्शकता असावी म्हणून स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांपासून डीनपर्यंत सगळ्यांना पत्र लिहून मृतांच्या आकडेवारीची पुन्हा पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर ही आकडेवारी दुरुस्त करण्यात आली. 

देवेंद्र फडणवीसांनी ही आकडेवारी स्वत:हून मिळवलेली नाही. तर ही माहिती मंत्रालयात आल्यानंतर विरोधी पक्षातील काही खबऱ्यांनी ही आकडेवारी फडणवीसांपर्यंत पोहोचवली. हे खबरी कोण आहेत हेही आम्हाला माहीत आहे. जेव्हा आम्ही जाणीवपूर्वक एखादी माहिती लपवत असू आणि ती तुम्ही उघड करता तेव्हा एखाद्याचं बिंग फोडलं असं तुम्ही म्हणू शकता. पण इथं स्वत: मुख्यमंत्र्यांनीच पत्र लिहून माहिती मागवल्याने इतरांनी बिंग फोडण्याचा प्रश्नच उद्धवत नाही, असंही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.

हेही वाचा - कोरोना मृत्यूचे आकडे लपवणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे- देवेंद्र फडणवीस

'इथं' वाढले मृत्यू

वाढलेल्या आकड्यांमध्ये अहमदनगर १, अकोला १४, अमरावती ६, औरंगाबाद ३३, बुलढाणा २, धुळे १२, जळगाव ३४, जालना ४, लातूर ३, नांदेड २, नाशिक २८, उस्मानाबाद ३, पालघर ११, परभणी १, पुणे ८५, रायगड १४, रत्नागिरी १, सांगली ४, सातारा ६, सिंधुदूर्ग ३, सोलापूर ५१, ठाणे १४६, वाशिम १, यवतमाळ १ अशी एकूण ४६६ तसंच मुंबईतील ८६२ कोरोनाबाधितांचे मृत्यू धरून एकूण आकडा १३२८ असा झाला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या निर्देशानुसार ११ जून रोजी राज्य शासनाने जिल्हा यंत्रणांना समायोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. कोविड-१९ रुग्णासंदर्भातील माहिती विविध जिल्ह्यातील रुग्णालयांमधून पोर्टलवर भरण्यात येते. राज्य शासन या माहितीची स्वत:हून फेरतपासणी करते. समायोजन केलेली माहिती ही वेबपोर्टलवर सार्वजनिक केली जाते. त्यामुळे आकडेवारीत वाढ दिसली तरी हेतूबाबत शंका घेण्याचे कारण असू नये, असं राज्य शासनाने स्पष्ट केलं आहे.

या प्रक्रियेला आकड्यांच्या फेरपडताळणीचं गोंडस नाव न देता, गेले ३ महिने ही आकडेवारी लपविणार्‍यांवर काय कारवाई करणार, हे सांगितलं गेलं पाहिजे. दोषींवर कठोर कारवाई ही झालीच पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी सरकारकडे केली आहे.

हेही वाचा - धक्कादायक! फेरपडताळणीत मुंबईसह राज्यात १३२८ आणखी कोरोनामृत्यू

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा