Advertisement

Shiv sena Dasara Melava 2022 : शिवसैनिकांचा जनसागर लोटला, घोषणांनी दादर परिसर दुमदुमला

फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून पहा शिवसैनिकांचा दसरा मेळाव्यासाठीचा उत्साह...

Shiv sena Dasara Melava 2022 : शिवसैनिकांचा जनसागर लोटला, घोषणांनी दादर परिसर दुमदुमला
SHARES

मुंबईतील शिवतीर्थावर शिवसेनेच्या दसरा (Dasara Melava) मेळाव्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिकांनी उपस्थिती लावली. माटुंगा-दादर-प्रभादेवी परिसर शिवसैनिकांच्या घोषणांनी दुमदुमून निघाला.

50 खोके एकदम ओके अशा घोषणा यावेळी शिवसैनिकांनी दिल्या. 

मुंबईसोबतच महाराष्ट्रातूनही शिवसैनिकांचा जनसागर शिवतीर्थावरआला होता. दादर स्थानक आणि दादरच्या आसपासच्या परिसरात शिवसैनिकांची गर्दी पहायला मिळत होती.गर्दीला संभाळण्यासाठी तितकाच पोलिसांचा बंदोबस्त देखील करण्यात आला होता. 

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी जनसागर लोटला होता. उद्धव ठाकरे आम्ही तुमच्या पाठिशी आहोत, अशा घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला. 

उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी आम्ही मोठ्या संख्येने मुंबईला आलो आहोत. खरी शिवसेना कोणाची हे कधी ठरेल माहीत नाही मात्र बाळासाहेबांचीच शिवसेना खरी आहे. त्याचे विचार ऐकण्यासाठी मुंबईत आलो आहोत, अशी प्रतिक्रिया शिवसैनिकांनी दिली आहे.

दरसा मेळाव्यासाठी शिवसेनेला तयारी करण्याची गरज लागत नाही. मेळावा आमच्यासाठी पर्वणी असते. 1966 पासून हा मेळावा सलग सुरू आहे. आमच्यापुर्वी असलेल्या जेष्ठ शिवसैनिकांनी या मेळाव्याला जाण्याची सुरुवात केली होती आणि आम्ही ती परंपरा जपण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे या मेळाव्यासाठी फार तयारी करावी लागली नाही, अशी भावना शिवसैनिकांनी व्यक्त केली आहे.

चिमुकल्यांनी वाढवला शिवसैनिकांचा उत्साह... रुपारेल कॉलेजवळील स्थानिक चिमुकल्यांचा उत्साह कौतुकास्पद... उद्धव ठाकरेंना पाठिंबा दाखवणारे फलक आणि उत्साही घोषणाबाजीमुळे चिमुकल्यांनी वेधलं लक्ष...

शिवसेनेचा दसरा मेळावा : शिवतीर्थावर अलोट गर्दी...

उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर दरवर्षीप्रमाणे यंदाही रावणाच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात आले. यावेळी ५० खोक्यांचा रावण जाळण्यात आला. 

आतापर्यंत दहा तोंडाचा रावण होता, आता तो 50 खोक्यांचा बकासूर झाल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली. याच खोकासूरचा दहन शिवतीर्थावर करण्यात आला...







हेही वाचा

तुम्ही गद्दारच, हा शिक्का पुसता येणार नाही : उद्धव ठाकरे

बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र, उद्धव ठाकरे यांचे मोठे बंधू जयदेव ठाकरे शिंदे गटात

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा