Advertisement

अजित पवार होणार मुख्यमंत्री? महत्त्वाची माहिती समोर

अजित पवार लवकरच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचा दावा मिटकरी यांनी केला आहे.

अजित पवार होणार मुख्यमंत्री? महत्त्वाची माहिती समोर
SHARES

उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्याचे मुख्यमंत्री असतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या ट्विटमुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. अमोल मिटकरींनंतर आता सुनील तटकरे यांनी अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. यामुळे अजीज पवार मुख्यमंत्री होणार या चर्चेला पुन्हा एकदा जोर आला आहे.

काय म्हणाले सुनील तटकरे?

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री पदाबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. सत्तेतील सहभागादरम्यान मुख्यमंत्री पदाबाबत स्पष्टता आली आहे. आता मुख्यमंत्रिपदाचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्या भेटीनंतर चर्चेला जोर आला. याबाबत तटकरे यांना विचारले असता ते म्हणाले की, राष्ट्रवादीने महाआघाडीत काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

सुनील तटकरे यांनी अजित पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं असून, मुख्यमंत्रीपद हा आता मुद्दा नाही असं तटकरे म्हणाले. अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावे, ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे. महाआघाडीत काम करण्याचा निर्णय झाला असला तरी एनडीएसोबत काम करण्याचा राष्ट्रवादीचा मानस असल्याचेही तटकरे यांनी स्पष्ट केले.

अमोल मिटकरी यांनी काय केले ट्विट?

अजित पवार लवकरच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचा दावा मिटकरी यांनी केला आहे. अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मिटकरी यांनी एक मजेशीर ट्विट केले होते. मी अजित अनंतराव पवार यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ देतो, अमोल मिटकरी यांनी अजितपर्व लवकरच सुरू होणार असल्याचा दावा करत व्हिडिओ शेअर केला, यावरून अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा सुरू झाली.



हेही वाचा

'जनतेच्या मनातील मुख्यमंत्री' एकनाथ शिंदेंच्या बंगल्याजवळ अजित पवारांचे बॅनर

"किरीट सोमय्यांनी मराठी महिलांचा गैरफायदा घेतला” : अंबादास दानवे

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा