Advertisement

"किरीट सोमय्यांनी मराठी महिलांचा गैरफायदा घेतला” : अंबादास दानवे

सोमय्यांवर असा आरोप करत 8 तासाच्या क्लिप त्यांच्याकडे असल्याचे दानवे म्हणाले. त्यांनी संबंधित पेंनड्राईव्ह देखील सादर केला.

"किरीट सोमय्यांनी मराठी महिलांचा गैरफायदा घेतला” : अंबादास दानवे
SHARES

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा एक कथित अश्लील व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हीडिओमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या व्हीडिओची विधिमंडळ अधिवेशनातही चर्चा झाली.

व्हीडिओवरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. विधानपरिषदेच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमय्यांवर गंभीर आरोप केलेत.

किरीट सोमय्या यांनी मराठी महिलांचा गैरफायदा घेतला, असा आरोप दानवेंनी केला आहे. किरीट सोमय्या यांनी मराठी महिलांचा गैरफायदा घेतला. या सगळ्या प्रकाराचे 8 तासाच्या क्लिप माझ्याकडे आहेत, असं दानवे म्हणालेत.

आपलं राज्य हे फुले, शाहू, आंबेडकरांचं आहे. जिजाऊ आणि, अहिल्यादेवी आणि सावित्रीमाईंच्या राज्यात महिलांवर अन्याय होतोय. ईडी, सीबीआयची भीती दाखवत महिलांना ब्लॅकमेल केलं जात आहे. त्यांचा गैरफायदा घेतला जात आहे.

भाजप पक्षातीलच महिलांना पक्षात पद देतो, महामंडळ देतो… माझे ईडीच्या अधिकाऱ्यांशी संबंध आहेत. सीबीआयशी संबंध आहेत, असं म्हणत महिलांचा गैरफायदा घेतला जातो, असे आरोप अंबादास दानवे यांनी किरीट सोमय्या यांच्यावर केले आहेत.

अनेक महिलांना राज्यसभा आणि विधान परिषदेत स्थान मिळवून देतो, असं म्हणत महिलांचा गैरफायदा घेतला जातो. या सगळ्याबाबतचे व्हीडिओ माझ्याकडे आहेत. महिलांच्या मजबुरीचा फायदा घेतला जातोय, असं दानवे म्हणाले आहेत.

अंबादास दानवे यांनी किरीट सोमय्या यांना इशारा दिला होता. किरीट सोमय्या, नागडा तर तु झालेलाच आहे. राहीलं साहिलं आज करतो, पेन ड्राईव्ह  घेऊन येतोये. भेटुया, सभागृहात!, असा इशारा दानवे यांनी दिला होता. त्यानुसार विधानपरिषदेत बोलताना त्यांनी सोमय्यांवर गंभीर आरोप केलेत.



हेही वाचा

आक्षेपार्ह स्थितीतील व्हायरल व्हिडिओवर किरीट सोमय्या म्हणाले...

किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल, चौकशीची मागणी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा