Advertisement

किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल, चौकशीची मागणी

किरीट सोमय्या यांच्या कथित व्हायरल व्हिडीओवरून (Viral Video)राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल, चौकशीची मागणी
SHARES

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांचा (Kirit Somaiya) आक्षेपार्ह व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. लोकशाही चॅनलने ही क्लिप उघड केली आहे. 

किरीट सोमय्या यांच्या कथित व्हायरल व्हिडीओवरून (Viral Video)राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

किरीट सोमय्या यांच्या कथित वादग्रस्त व्हायरल व्हिडिओप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. हा मुद्दा आपण अधिवेशनात उचलणार असल्याचं अंबादास दानवेंनी एका वृत्तवाहिनीला सांगितले. 

लाईव्ह शो दरम्यान, लोकशाहीचे संपादक कमलेश सुतार यांनी कोणाच्याही गोपनीयतेवर आक्रमण करण्याचा त्यांचा हेतू नसल्याचे व्यक्त केले. तसेच व्हिडिओच्या सत्यतेबद्दल आणि संबंधित तक्रारींबाबत सोमय्या यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले.

किरीट सोमय्या यांनी स्वत: अश्लील गोष्टी केल्या असताना दुसऱ्यांवर चिखलफेक करण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही, असे शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी म्हटले आहे.

"किरीट सोमय्या यांचा व्हिडिओ मला वैयक्तिकरित्या निराशादायक वाटला. भ्रष्टाचार उघड करण्यासाठी ओळखले जाणाऱ्या एका प्रमुख व्यक्तीचे, जर असे गैरवर्तन असेल तर मला वाटते की योग्य कारवाई केली पाहिजे," असे चव्हाण म्हणाल्या. 

अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील यांनी या व्हिडिओची सत्यता तपासणे आणि आवश्यक कायदेशीर उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

"अशाप्रकारचा व्हिडिओ समोर येणे अत्यंत गंभीर आणि खेदजनक आहे. किरीट सोमय्या हे एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व असून त्यांनी भ्रष्टाचाराची अनेक उदाहरणे उघडकीस आणली आहेत. अशा स्वरूपाचे व्हिडिओ असल्यास, योग्य कायदेशीर कार्यवाही सुरू करणे अत्यावश्यक आहे," त्या म्हणाल्या. 



हेही वाचा

आक्षेपार्ह स्थितीतील व्हायरल व्हिडिओवर किरीट सोमय्या म्हणाले...

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा