भिवंडीत (bhiwandi) शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. त्याची किंमत तेथील पोलीस उपायुक्तांना मोजावी लागली. 24 तासांच्या आत कोणाला काहीही कळू न देता त्यांची बदली करण्यात आली, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला.
सरकारला पोलिसांच्या मदतीने दंगली घडवून पोलिसांचाच (police) बळी द्यायचा आहे, असा आरोपही राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी केला आहे.
महाराष्ट्राच्या पोलीस खात्याचा राजकीय हत्यार म्हणून वापर करण्याचा या सरकारचा डाव महाराष्ट्राला महागात पडेल, असेही त्यांनी म्हटले आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांची असते.
परंतु, ही जबाबदारी उत्तमरित्या पार पाडलेली या सरकारला आवडत नाही. कारण, या सरकारला कायदा आणि सुव्यवस्था बिघडवायची आहे, असा आरोप आव्हाड यांनी केला आहे.
पोलीस उपायुक्तांच्या बदलीमागील कारण काय तर या सरकारच्या मनात जी दंगल होती ती दंगल (riot) घडण्यापासून रोखण्यात आले आणि हे नारळ त्यांनी पोलीस उपायुक्ताच्या डोक्यावर फोडले, असा आरोपही त्यांनी केला.
सबंध महाराष्ट्रातील पोलिसांनी यातून धडा घ्यावा की, या सरकारचे नेमके उद्दिष्ट काय आहे? या सरकारला तुमच्या मदतीने दंगली घडवायच्या आहेत आणि या दंगलींनंतर तुमचाच बळी द्यायचा आहे.
महाराष्ट्राच्या (maharashtra) पोलीस खात्याचा राजकीय हत्यार म्हणून वापर करण्याची या सरकारची सवय महाराष्ट्राला महागात पडेल, असेही त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा