Advertisement

ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना राज्यसभेची उमेदवारी


ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना राज्यसभेची उमेदवारी
SHARES

ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यसभेवर जाणाऱ्या सदस्यपदासाठी काँग्रेसतर्फे यादी जाहीर करण्यात आली. या यादीत महाराष्ट्रातून केतकर यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.


काँग्रेसतर्फे यादी जाहीर

कुमार केतकर हे मागील १० वर्षांपासून राज्यसभेवर जाण्याचा प्रयत्न करत होते. यासाठी त्यांनी अनेकदा काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवर आपलं नाव पुढे केलं होतं. परंतु, आजवर त्यांच्या नावाचा विचार न करणाऱ्या काँग्रेसने यावेळी त्यांना राज्यसभेवर पाठवण्याचा विचार केला.


यापूर्वी 'हे' पत्रकार राज्यसभेत

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं आहे. तर, ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत यांनाही शिवसेनेने राज्यसभेवर पाठवलं होतं. त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर काँग्रेसतर्फे राज्यसभेवर जाणार आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा