महाराष्ट्रातील (maharashtra) विधानसभा निवडणुकीनंतर आता बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीची (elections) चर्चा सुरू झाली आहे. विधानसभेतील दणदणीत यशामुळे आता महायुती (mahayuti) संधीचे सोने करून लवकरात लवकर निवडणुका घेईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
महापालिकेच्या नगरसेवकांची मुदत 7 मार्च 2022 रोजी संपली होती. महापालिकेचा कार्यकाळ संपून जवळपास अडीच वर्षे उलटली आहेत. देशातील सर्वात श्रीमंत महापालिका लोकप्रतिनिधींशिवाय अडीच वर्षांपासून सुरू आहे. सध्या महापालिका प्रशासकांच्या अधिपत्याखाली आहे. या महापालिकेचे दोन अर्थसंकल्प आतापर्यंत प्रशासकांनी सादर केले आहेत.
फेब्रुवारी 2022 मध्ये महापालिका (brihanmumbai municipal corporation) निवडणुका होणे अपेक्षित होते. मात्र या दोन वर्षांत राज्यातील राजकारणातील मोठ्या घडामोडींमुळे महापालिका निवडणुकाही रखडल्या होत्या. मात्र आता विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्यात भाजप आणि महायुतीने मोठे यश मिळवले. त्यामुळे महापालिकेची निवडणूक लवकरच होण्याची शक्यता आहे.
भाजप आणि महायुतीसाठी पोषक वातावरण असल्याने निवडणूक लवकरात लवकर होईल, असा अंदाज वर्तवला जात होता. ही निवडणूक मे महिन्यापूर्वी होईल, अशीही अपेक्षा आहे. या निवडणुकीत 227 प्रभागांचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे
2021 च्या दिवाळीच्या पूर्वसंध्येला, महाविकास आघाडी (maha vikas aghadi) सरकारने मुंबईतील (mumbai) प्रभागांची (wards) संख्या 227 वरून 236 करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी, भाजपने शिवसेनेच्या नेत्यांवर त्यांच्या पक्षाच्या फायद्यासाठी प्रभाग वाढवून फेरफार केल्याचा आरोप केला होता.
जुलै 2022 मध्ये ओबीसी आरक्षण लागू झाले होते, त्यामुळे दुसऱ्यांदा आरक्षण हटवण्यात आले. तथापि, काही भाजप प्रतिनिधींनी प्रभागांची संख्या 227 करण्याची जोरदार मागणी सुरू ठेवली. अखेरीस, उच्च न्यायालयाने प्रभागांची संख्या 227 वर ठेवण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा