Advertisement

संभाजीराजेंच्या नावाची अॅलर्जी असेल तर सांगा- चंद्रकांत पाटील

औरंगजेबाचं नावं औरंगाबादला कशासाठी ठेवायचं? संभाजी महाराजांबद्दल अ‍ॅलर्जी असेल, तर दुसरं नाव सांगा, असा प्रश्न विचारत औरंगाबाद जिल्ह्याचं नाव बदलण्यास विरोध करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टोमणा मारला आहे.

संभाजीराजेंच्या नावाची अॅलर्जी असेल तर सांगा- चंद्रकांत पाटील
SHARES

औरंगजेबाचं नावं औरंगाबादला कशासाठी ठेवायचं? संभाजी महाराजांबद्दल अ‍ॅलर्जी असेल, तर दुसरं नाव सांगा, असा प्रश्न विचारत औरंगाबाद जिल्ह्याचं नाव बदलण्यास विरोध करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला भाजप (bjp) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टोमणा मारला आहे. 

औरंगाबाद महापालिकेची सत्ता हातात द्या, सत्ता आल्यावर औरंगाबादला “संभाजीनगर” नाव देऊ असं वक्तव्य करणारे चंद्रकांत पाटीलजी, आमच्या हातात गुजरात द्या आम्ही “अहमदाबाद”चं नाव बदलून दाखवतो, वाटल्यास तुमचं नाव देतो. इतक्या वर्षांपासून सत्ता भोगून ‘अहमदाबाद’ नाव बदलता येत नाही का?,” असं प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरींनी केला होता.

त्याला प्रतिउत्तर देताना चंद्रकांत पाटील (chandrakant patil) म्हणाले, देशामध्ये परकीय आक्रमणाची जी खाणाखुणा असलेली नावं आहेत. ती बदला. अहमदाबादचं नाव बदला, उस्मानाबादचं पण बदला, माझी काहीच अडचण नाही, पण औरंगाबादचं नाव बदलायचं नाही असं तुम्ही ठरवत असाल, तर तुमचं औरंगजेबावर प्रेम आहे? संभाजी महाराजांवर नाही. संभाजीमहाराजांबद्दल अ‍ॅलर्जी असेल, तर दुसरं नाव सांगा. 

हेही वाचा- शहरांची नावं बदलून विकास होत नाही, राष्ट्रवादीची परखड भूमिका 

अहमदाबादचं कर्णावती करायला माझी काहीच हरकत नाही. परंतु जिथं तुमची सत्ता आहे तिथली नावं आधी बदला. यांच्याकडे औरंगाबादचं संभाजीनगर करायची इच्छाशक्ती नाही. महाविकास आघाडीला केवळ महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राजकारण करायचं आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.

तत्पूर्वी, औरंगाबादच्या नामांतरावरून महाविकास आघाडीत फूट पडल्याचा दावा विरोधकांकडून केला जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसने (ncp) देखील नामांतराबाबत आपली भूमिका मांडली आहे. शहरांची नावं बदलून विकास होतो, असं आम्ही मानत नाही, असं परखड मतच राष्ट्रवादीने मांडलं आहे. यामुळे नामांतराच्या मुद्द्यावर सहकारी पक्षाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना कितपत साथ मिळेल हा चर्चेचा विषय बनला आहे. 

औरंगाबादचं नामांतर वा कुठल्याही शहरांची नावं बदलण्याचा मुद्दा महाविकास आघाडी सरकारच्या अजेंड्यावरील विषय नाही. अशा प्रकारचा प्रस्ताव २० वर्षांपूर्वीच आम्ही अमान्य केला होता. नावं बदलून शहरांचा विकास होतो असं आम्ही मानत नाही. त्यामुळे याबाबत वेगळं काही बोलण्याचा प्रश्नच येत नाही. विरोधकांनी कितीही अफवा पसरवल्या तरीही महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले.

(maharashtra bjp president chandrakant patil slams ncp over aurangabad name change issue)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा