Advertisement

जीएसटीनंतरचा राज्याचा पहिला अर्थसंकल्प, ९ मार्चला होणार सादर


जीएसटीनंतरचा राज्याचा पहिला अर्थसंकल्प, ९ मार्चला होणार सादर
SHARES

येत्या २६ फेब्रूवारीपासून राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होत असून, ९ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प दोन्ही सभागृहात सादर केला जाणार आहे.

गुरूवारी कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानभवनात पार पडली. या बैठकीत ही माहिती देण्यात आली. त्यानुसार येत्या २६ फेब्रुवारीपासुन सुरू होणारं अर्थसंकल्पीय अधिवेशन २८ मार्चपर्यंत चालणार आहे.


'हे' सादर करणार?

तर राज्याचा अर्थसंकल्प ९ मार्च रोजी सभागृहात सादर केला जाणार आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे विधानसभेत, तर अर्थराज्यमंत्री दिपक केसरकर विधानपरिषदेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील. वस्तू आणि सेवा कर कायद्यानंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे.

राज्यावरील कर्जाचा वाढता बोजा आणि आगामी निवडणुकांच्या दृष्टीने महत्वपूर्ण असणाऱ्या अर्थसंकल्पात योजना आणि त्यावरील खर्चाचा ताळमेळ अर्थमंत्री कसा घालतात? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा