Advertisement

Sarthi: अवघ्या २ तासांत ‘सारथी’ला मिळाले ८ कोटी, अजित पवारांचा झटपट निर्णय

मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी कार्यरत ‘सारथी’ संस्थेला ८ कोटी रुपयांचा निधी देत असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केल्यानंतर अवघ्या २ तासांतच हा निधी संस्थेला उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

Sarthi: अवघ्या २ तासांत ‘सारथी’ला मिळाले ८ कोटी, अजित पवारांचा झटपट निर्णय
SHARES

मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी कार्यरत ‘सारथी’ संस्थेला ८ कोटी रुपयांचा निधी देत असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केल्यानंतर अवघ्या २ तासांतच हा निधी संस्थेला उपलब्ध करुन देण्यात आला (maratha community sarthi organization get 8 crore rupees from dy cm ajit pawar) आहे. यासंदर्भातील पत्र ‘सारथी’ संस्थेला पाठविण्यात आलं आहे. झपाट्याने काम करणारे अजित पवार यांची निर्णयक्षमता यानिमित्ताने पुन्हा एकदा दिसून आली.

निधी जमा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरूवारी सकाळी ११ वाजता मंत्रालयातील त्यांच्या दालनात खासदार छत्रपती संभाजीराजे व मराठा समाज प्रतिनिधींची बैठक घेतली. दुपारी दीड वाजता संस्थेला ८ कोटी देत असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं. त्यानंतर अवघ्या २ तासात म्हणजे साडेतीन वाजण्याच्या सुमारास इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने पत्र क्र.संकिर्ण २०१९/प्र.क्र.११७/महामंडळे, ९ जुलै २०२० निर्गमित करण्यात आले असून त्याद्वारे सुमारे ७ कोटी ९४ लाख ८९ हजार २३८ रुपये इतका निधी ‘सारथी’ संस्थेला तातडीने उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

हेही वाचा - Maratha Reservation: मराठा आरक्षणावर आता दररोज सुनावणी

सारथी सुरूच राहील

तत्पूर्वी, मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी स्थापन झालेली ‘सारथी’ संस्था कुठल्याही परिस्थितीत बंद होणार नाही. संस्थेची स्वायत्तता कायम राहील. ‘सारथी’च्या विकासासाठी सर्वस्व पणाला लावण्याची राज्य सरकारची तयारी आहे. त्यामुळे  ‘सारथी’च्या संदर्भात जाणीवपूर्वक करण्यात येणारे आरोप थांबववावेत, असा खुलासा अजित पवार यांनी केला.

नियोजन विभागाअंतर्गत

मराठा समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी काम करणारी ‘सारथी’ आणि आर्थिक विकासासाठी काम करणारे ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ’ या दोन्ही संस्था अनुक्रमे ओबीसी व कौशल्य विकास मंत्रालयाऐवजी पुढच्या काळात नियोजन विभागाच्या अंतर्गत काम करतील. यासंबंधीचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करुन घेण्यात येईल. याचाच अर्थ या दोन्ही संस्थांची जबाबदारी आता नियोजनमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत:कडे घेतली आहे. 

पारदर्शकता राखणार

‘सारथी’चा कारभार पुढच्या काळात अधिक पारदर्शक व नियमानुसारंच होईल. संस्थेकडून होणारा खर्च दरमहा वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल. दर २ महिन्यांनी कामाचा आढावा घेऊन, आलेल्या नवीन सूचना, कल्पना विचारात घेऊन वाटचालीची पुढची दिशा निश्चित करण्यात येईल. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने सुरु झालेल्या संस्थेचा कारभार राजर्षींच्या नावाला साजेशा पद्धतीनं, त्यांचा गौरव वाढवणारा असेल, याची काळजी घेऊ. ‘सारथी’चा गौरव वाढवण्यासाठी सर्वस्व पणाला लावण्याची तयारी असल्याचंही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. 

हेही वाचा - Sarthi: ‘सारथी’ बंद होणार नाही, अजित पवार यांचं आश्वासन


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा