Advertisement

Sarthi: ‘सारथी’ बंद होणार नाही, अजित पवार यांचं आश्वासन

मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी स्थापन झालेली ‘सारथी’ संस्था कुठल्याही परिस्थितीत बंद होणार नाही. संस्थेची स्वायत्तता कायम राहील, असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.

Sarthi: ‘सारथी’ बंद होणार नाही, अजित पवार यांचं आश्वासन
SHARES

मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी स्थापन झालेली ‘सारथी’ संस्था कुठल्याही परिस्थितीत बंद होणार नाही. संस्थेची स्वायत्तता कायम राहील. ‘सारथी’च्या विकासासाठी सर्वस्व पणाला लावण्याची राज्य सरकारची तयारी आहे. त्यामुळे  ‘सारथी’च्या संदर्भात जाणीवपूर्वक करण्यात येणारे आरोप थांबववावेत, असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (maratha community sarthi organisation will work continue says dy cm ajit pawar) यांनी सांगितलं.

‘सारथी’ संस्थेसमोरील विविध प्रश्न सोडवण्यासाठी अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी मंत्रालयात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, खासदार छत्रपती संभाजीराजे, आमदार विनायक मेटे आदींसह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, मराठा समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

८ कोटींचा निधी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं की, ‘सारथी’संस्थेसंदर्भात विविध व्यक्ती, संस्था, मान्यवरांकडून आलेली निवेदने, पत्रे, मागण्यांची नोंद घेण्यात आली आहे, त्यांचा एकत्रित विचार करुन सर्वांच्या मनासारखा सकारात्मक निर्णय व्हावा, ही सरकारची भूमिका आहे. त्याअनुषंगाने मराठा समाजाच्या विविध विद्याशाखा, अभ्यासक्रमात शिकणाऱ्या, स्पर्धापरिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व शैक्षणिक शुल्क त्वरीत मिळावं यासाठी ८ कोटी रुपये ‘सारथी’ला देण्यात येतील. ‘तारादूत’ यांना २ महिन्यांचा प्रलंबित निधी तात्काळ दिला जाईल. 

हेही वाचा - Maratha Reservation: मराठा समाजाच्या प्रलंबित सवलतीबाबत सरकार सकारात्मक- अशोक चव्हाण

नियोजन विभागाअंतर्गत

मराठा समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी काम करणारी ‘सारथी’ आणि आर्थिक विकासासाठी काम करणारे ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ’ या दोन्ही संस्था अनुक्रमे ओबीसी व कौशल्य विकास मंत्रालयाऐवजी पुढच्या काळात नियोजन विभागाच्या अंतर्गत काम करतील. यासंबंधीचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करुन घेण्यात येईल. याचाच अर्थ या दोन्ही संस्थांची जबाबदारी आता नियोजनमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत:कडे घेतली आहे. छत्रपती संभाजीराजे यांनीही या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

पारदर्शकता राखणार

‘सारथी’चा कारभार पुढच्या काळात अधिक पारदर्शक व नियमानुसारंच होईल. संस्थेकडून होणारा खर्च दरमहा वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल. दर २ महिन्यांनी कामाचा आढावा घेऊन, आलेल्या नवीन सूचना, कल्पना विचारात घेऊन वाटचालीची पुढची दिशा निश्चित करण्यात येईल. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने सुरु झालेल्या संस्थेचा कारभार राजर्षींच्या नावाला साजेशा पद्धतीनं, त्यांचा गौरव वाढवणारा असेल, याची काळजी घेऊ. ‘सारथी’चा गौरव वाढवण्यासाठी सर्वस्व पणाला लावण्याची तयारी असल्याचंही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा