Advertisement

कोरोना बचावसाठी 'या' आमदाराने त्याचं संपूर्ण वेतन जनतेला दिलं


कोरोना बचावसाठी 'या' आमदाराने त्याचं संपूर्ण वेतन जनतेला दिलं
SHARES
Advertisement

देशात कोरोना या संसर्ग रोगाने थैमान घातले आहे. संपूर्ण प्रशासन या परिस्थितीशी दोन करण्यात व्यस्त असताना. महाराष्ट्रातल्या या तरुण आमदाराने कोरोना पासून बचावासाठी त्याचा संपूर्ण पगार देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. काॅग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्धीकी यांचा मुलगा आमदार झिशान सिद्दीकीने हा निर्धार केलाआहे. वांद्रे पूर्व मतदारसंघातील कॉंग्रेस आमदाराने ‘कोरोना’बचावासाठी अॅक्शन प्लॅन ही आखला आहे. यंदाच्या विधानसभेतील सर्वात तरुण आमदार झिशान सिद्दीकी हा ओळखला जातो. त्याच्या या निर्णयामुळे त्याचे सर्वच स्तराहून कौतुक केले जात आहे.  

हेही वाचाः- काय... धोनी निवृत्त, बीसीसीआयकडून धोनीचा फोटो शेअर

 देशात कोरोना या संसर्ग रोगाचे प्रमाण कमी होण्याचे काही नाव घेत नाही. काल पर्यंत ४९ वर असलेला कोरोना बाधीत रुग्णांचा आकडा आज ५२ वर जाऊन पोहचाल आहे. संपूर्ण प्रशासनाकडून हा संसर्ग रोग पसरू नये. याबाबत खबरदारी घेतली जात आहे. नागरिकांना घरा बाहेर पडण्यास मनाई केली असून शाळा महाविदयालय, खासगी कंपन्यांना ही बंद ठेवण्याचे आवाहन सरकारने केले आहे. परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत असताना. नागरिकांमध्ये ही चिंतेचे वातावरण आहे. नागरिकांना धीर देण्यासाठी आता लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला आहे. वांद्रेतील नवोदीत आमदार झिशान सिद्दीकीने त्याचा संपूर्ण पगार हा कोरोना बचावासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. तसे ट्विटच झिशानने केले आहे. 

हेही वाचाः- दुकान उघडी ठेवल्यास होणार कारवाई - अनिल देशमुख

झिशान यांच्या मतदार संघातील बहुतांश भाग हा झोपडपट्यांनी व्यापलेला आहे. त्यातच मास्क आणि सॅनेटाइझरचा राज्यात तुटवडा आहे. तर अनेक दुकानात मास्क आणि सॅनेटाइझर हे दुप्पट किंमतीने विकले जात आहे.  तेथे राहणाऱ्या नागरिकांची परिस्थिती लक्षात घेता. त्यांच्या खिशाला ते परवडनारे नाही. हिच बाब लक्षात घेऊन झिशान यांनी  कोरोना या संसर्ग रोगाच्या बचावासाठी मतदार संघात ३० हजार मास्क आणि ३ हजार मिली सँनिटायझर्स वाटण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कोरोनाला रोखण्यासाठी झिशान यांनी त्यांच्या मतदार संघात अॅक्शन प्लाॅन ही बनवला आहे. वेतनातील पैशातून झिशान यांनी हे साहित्य नागरिकांना देऊ केले असल्याची माहिती झिशान सिद्दीकी यांनी ट्विटरवरुन दिली आहे.

संबंधित विषय
Advertisement