Advertisement

दुकान उघडी ठेवल्यास होणार कारवाई - अनिल देशमुख

गृहमंत्र्यांनी नागपूर मधील परिस्थितीचा आढावा घेतला

दुकान उघडी ठेवल्यास होणार कारवाई - अनिल देशमुख
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पानठेले, हॉटेल आणि रेस्टारंट बंद करण्याचे आदेश देण्यात आले असताना. शहरात अनेक जण नियमांचे पालन करताना दिसत नाही. गुरूवारी खुद्द गृहमंत्र्यांनी नागपूर मधील परिस्थितीचा आढावा घेतला असता. त्यांना अनेक हॉटेल सर्रासपणे सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांवर १८८ नुसार कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.



देशात कोरोना या संसर्ग रोगाने थैमान घातला असताना. हा संसर्ग रोग दिवसेंदिवस वाढतच जात आहे. आतापर्यंत राज्यात ४९ जण या संसर्गरोगाने ग्रस्त आहेत. तर २ जणांचा आतापर्यंत या रोगाने बळी घेतला आहे. या संसर्ग रोगाला रोखण्यासाठी सरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असताना. काही नागरिकांकडून मात्र सहकार्य केले जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. हा संसर्ग रोग पसरू नये, नियंत्रणात रहावा. या उद्देशाने सरकारने शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. मुलांच्या परीक्षा ही पुढे ढकललेल्या आहेत. तर अनेक काॅर्पोपट्स कंपन्यांना ५० टक्के कर्मचाऱ्यांवर कंपन्या सुरू ठेवून बाकीच्यांना वर्क फॅार्म होम चे आदेश दिलेले आहे. तर शक्यतो प्रवास टाळा, घराबाहेर पडू नका अशा ही सूचना देण्यात आलेल्या आहे. तर दुकान दारांना पुढील आदेश मिळेपर्यंत दुकान बंद करण्याचे आदेश दिलेले आहे. 


मात्र तरी ही अनेक दुकान हाॅटेल मालक नियमांचे उल्लघंन करून दुकान सुरूच ठेवत आहेत. गुरूवारी गृहमंत्र्यांनी नागपूर येथील परिस्थितीचा आढावा घेतला असता. त्यांना प्रसिद्ध मिठाईवाला हळदीराम यांचे दुकान सुरू असल्याचे दिसले. तर आसपास परिसरातील काही हाॅटेल ही सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर गृहमंत्र्यांनी त्यांच्यावर १८८ नुसार कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर नागरिकांनी आणि दुकान मालकांनी कृपया दुकान बंद ठेवून सहकार्य करावे, अन्यथा कारवाईला सामोरे जावे असा सज्जड दमच प्रसार माध्यमांच्या द्वारे दिला आहे.  

हेही वाचाः- Coronavirus Updates: सुरक्षेसाठी व्यापाऱ्यांचा दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा