Advertisement

Coronavirus Updates: सुरक्षेसाठी व्यापाऱ्यांचा दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेतला मुबईसह राज्यभरातील व्यापारांनी दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Coronavirus Updates: सुरक्षेसाठी व्यापाऱ्यांचा दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय
SHARES

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेतला मुबईसह राज्यभरातील व्यापारांनी दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. काही भागातील दुकानं सोमवार, बुधवार, शुक्रवार व रविवार, तर काही भागातील दुकानं मंगळवार, गुरुवार, शनिवार व रविवारी बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतला आहे.

घाटकोपरमधील दुकानं पुढील ३ दिवस बंद ठेवण्याचा उत्स्फूर्त निर्णय स्थानिक व्यापाऱ्यांनी घेतला आहे. घाटकोपर व्यापारी मंडळ तसेच अन्य व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींच्या बुधवारी झालेल्या बैठकीत पुढील तीन दिवस म्हणजे शुक्रवार ते रविवार घाटकोपरमधील सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या तीन दिवसांत फेरीवाल्यांनाही धंदा बंद ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी सुरू झाली आहे. कोणत्या भागातील दुकानं कधी बंद असतील याची वॉर्डनिहाय यादी पालिकेनं जाहीर केली आहे. तूर्तास तरी अत्यंत गजबजलेल्या दक्षिण मुंबई, दादर व पश्चिम उपनगरांतील काही भागांना प्राधान्य दिल्याचं दिसतं. तुलनेते कमी गर्दी असलेल्या विभागांची यादी अजून प्रसिद्ध झालेली नाही.

दक्षिण मुंबईतील गजबजलेला कपडा बाजार, मनीष मार्केट ठराविक दिवशी बंद राहणार आहे. गेट वे ऑफ इंडियाचाही या यादीत समावेश आहे. दादर, नरिमन पॉइंट परिसरातही कडक अंमलबजावणी होणार आहे.

सोमवार, बुधवार, शुक्रवार व रविवार बंद होणारी दुकानं

फोर्ट, एम. जी. पी. मार्केट व परिसर, मनीष मार्केट, मुसाफिर खाना, लोकमान्य टिळक मार्ग, आनंदीबाई पोदार मार्ग, महर्षी कर्वे मार्गापासून आनंदीबाई पोदार मार्ग जंक्शन ते चर्चगेट स्थानक, कुलाबा व कफ परेड, जी. डी. सोमाणी मार्ग, नाथालाल पारेख मार्ग, ग्रँट रोड, गावदेवी, गिरगाव, मुंबई सेंट्रल, ताडदेव, मलबार हिल, महालक्ष्मीमधील काही भाग, वांद्रे, खार, सांताक्रूझमधील काही भाग, प्रभादेवी, वरळी, लोअर परळ, दादर, माटुंगा, वडाळा, सायन, अँटॉप हिल, काळबादेवी, अब्दुल रेहमान स्ट्रीट, भुलेश्वर, मंगलदास मार्केटसह सर्व कपडा बाजार.

मंगळवार, गुरुवार, शनिवार व रविवार बंद होणारी दुकानं

फोर्ट व बॅलार्ड इस्टेट, नरिमन पॉइंट, चर्चगेट पश्चिम, कुलाबा, गेट वे ऑफ इंडिया, ग्रँट रोड, गावदेवी, चर्नी रोड, गिरगाव, मुंबई सेंट्रल, ताडदेव, मलबार हिल, महालक्ष्मीमधील काही भाग, वांद्रे, खार, सांताक्रूझ, प्रभादेवी, वरळी, लोअर परळ, दादर, माटुंगा, वडाळा, सायन, अँटॉप हिल, महम्मद अली रोड, पी. डिमेलो रोड, दहिसर पूर्व पश्चिमेकडील काही भाग, प्रिन्सेस स्ट्रीट.

कुर्ला पोलिसांची कारवाई

कुर्ला पश्चिमेकडील भाग हा अत्यंत गर्दीचा आहे. या भागात दुकाने व फेरीवाल्यांची संख्या जास्त आहे. बुधवारी सकाळी ११.४५ वाजताच्या सुमारास पोलिसांनी या परिसरातील दुकानं बंद केली. कोणतीही पूर्वसूचना न देता दुकानं बंद करण्यास सांगितल्यामुळं नाराजी होती.

दादरमधील दुकानं गुढीपाडव्यापर्यंत बंद

दादरमधील दुकाने गुढीपाडव्यापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय दादर व्यापारी संघाने घेतला आहे. ९०० सदस्य संख्या असलेल्या या संघटनेतील ६१० दुकाने दादर पश्चिमेकडील आहेत. कीर्तिकर मार्केट येथील श्री दादर इमिटेशन अँड कटलरी असोसिएशनची डिसिल्वा रोडवरील ८० दुकानेही बंद राहणार आहेत.



हेही वाचा -

कोरोनाच्या संकटाला कसं तोंड द्यायचं? राज ठाकरेंनी सांगितला उपाय

Coronavirus : 'त्या' कोरोनाबाधितानं लावली चक्क लग्नाला हजेरी, सगळेच संशयाच्या फेऱ्यात



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा