Advertisement

Coronavirus : 'त्या' कोरोनाबाधितानं लावली चक्क लग्नाला हजेरी, सगळेच संशयाच्या फेऱ्यात

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, तो जवळजवळ १,००० लोकांच्या संपर्कात आला असावा.

Coronavirus : 'त्या' कोरोनाबाधितानं लावली चक्क लग्नाला हजेरी, सगळेच संशयाच्या फेऱ्यात
SHARES

कल्याणमधल्या आणखी एका व्यक्तीची कोरोनाव्हायरसची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या रुग्णाला कस्तुरबामध्ये पाठवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पण चिंतेची बाब म्हणजे या व्यक्तीनं सोलापूरमधील एका लग्नाला उपस्थिती लावली होती. त्यामुळे या रुग्णाच्या प्रवासाची संपूर्ण माहिती जमा करण्यात आली. त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांचा शोध घेण्यासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आलं.


१००० रुग्ण संशयित

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, तो जवळजवळ १,००० लोकांच्या संपर्कात आला असावा. तो रुग्ण ज्यांच्या संपर्कात आला त्यांची माहिती मिळवण्यात आली आहे. परंतु त्यांच्यामध्ये आतापर्यंत कोणतीही लक्षणं आढळली नाहीत. आतापर्यंत कल्याणमध्ये कोरोगनाग्रस्त ३ रुग्णांची चांचणी पॉझिटिव्ह आढळी आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अंश:हा लॉकडाऊनची वेळ महाराष्ट्रावर आली आहे.


अमेरीका-मुंबई-सोलापूर

केडीएमसीच्या मते, कल्याणमध्ये राहणारा हा कोरोनाग्रस्त रुग्ण ६ मार्च २०२० रोजी अमेरिकेतून मुंबईला परत आला. विमानतळावरुन उतरल्यावर त्यानं कल्याणसाठी टॅक्सी घेतली. त्याच संध्याकाळी, तो एका नातेवाईकाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी हुतात्मा एक्स्प्रेसनं सोलापूरला गेला. पुन्हा सोलापूरहून तो रेल्वेनंच मुंबईला आला.


केडिएमसीनं पाठवलं पत्र

केडीएमसीनं खबरदारीचा उपाय म्हणून सोलापूर आणि पुणे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून त्यांना रुग्णांच्या प्रवासाच्या इतिहासाची माहिती दिली आहे. शिवाय या रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना शोधण्यास देखील सांगितलं आहे.


संपर्कात येणाऱ्यांचा शोध

९ मार्चपासून रुग्णाला कोरोनाची लक्षणं दिसू लागली होती. त्यानंतर त्याची कस्तुरबा रुग्णालयात कोरोनाव्हायरसची तपासणी करण्यात आली. त्याची मुलगी आणि त्यांची पत्नी यांच्या चाचण्या देखील पॉझिटिव्ह आल्या आहेत. सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी हिंदुस्तान टाईम्सला सांगितलं की, “होय, आम्हाला केडीएमसीकडून पत्र प्राप्त झालं आहे आणि आम्ही संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार केलं आहे.”

पथक तयार

जिल्हा प्रशासनानं प्रत्येकी पाच सदस्यांच्या १० टीम तयार केल्या आहेत. गाव तलाठी आणि ग्रामसेवकाच्या मदतीनं हे लग्न झालेल्या सर्वांना ओळखण्याची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत सापडलेल्यांच्यात कोणालाही लक्षणं आढळली नाहीत आणि शोध मोहीम चालू आहे.

यापूर्वी पालघर स्थानकात वांद्रे टर्मिनस-दिल्ली गरीबरथ एक्स्प्रेस ट्रेनमधून जर्मनीत परत आलेल्या चार प्रवाशांच्या हातावर 'होम क्वारेन्टाईन' स्टॅम्प होते. मुंबईपासून सुमारे १०० कि.मी. अंतरावर हे तरुण डी-बोर्डिंग झाले होते. पश्चिम रेल्वेच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, पालघर स्थानकातील १२२१६ गरीबरथच्या कोच क्रमांक जी 4 आणि जी 5 मधून हे चार प्रवासी डी-बोर्डेड झाले होते. इतर प्रवासी आणि तिकीट परीक्षक यांनी त्यांच्या हातावरील शिक्के पाहून त्यांना पालघरला उतरवलं.



हेही वाचा

Coronavirus Update: आपण फेज २ मध्ये, पुढचे १० दिवस खूप महत्त्वाचे - आरोग्यमंत्री राजेश टोपे

Coronavirus : क्वारंटाइनचा शिक्का असलेल्या ६ जणांचा सौराष्ट्र एक्स्प्रेसमधून प्रवास

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा