Advertisement

राज ठाकरेंचा नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा, पाडवा मेळाव्यात मोठी घोषणा

शिवतीर्थावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पाडवा मेळावा पार पडला.

राज ठाकरेंचा नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा, पाडवा मेळाव्यात मोठी घोषणा
SHARES

"माझी महाराष्ट्रातील अपेक्ष आहे की, जनतेकडून व्याभिचाराला राज मान्यता मिळू नये. तस झालं तर पुढचे दिवस भीषण आहेत. वाटाघाटी सुरू  होत्या तेव्हा मी यांना सांगितलं मला विधानपरिषदही नको आणि राज्यसभा नको. महाराष्ट्र नवनिर्माण सेना नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा देत आहे. असं मी जाहीर करतो, असं मनसेप्रमुख राज ठाकरे म्हणाले. शिवतीर्थावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पाडवा मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र कर भरतो. तेवढाच निधी वाट्याला यावा, अशी अपेक्षा आहे. येणारी निवडणूक या देशाचे भविष्य ठरवणार आहे. अनेक निवडणुका येतील. विधानसभा निवडणुका येतील. त्यामध्ये काय होईल? मी इथेच गेल्यावर्षी सभेत महाराष्ट्रात कॅरम चुकीचा फुटला आहे, असं सांगितलं होतं. कोणती सोंगटी कुठे पडलीये माहिती नाही. माझ्या महाराष्ट्रातला शेतकरी जीन्स घालून ट्रॅक्टरवर बसलेला हवा आहे. सर्वात तरुण देश आज भारत आहे. सर्वाधिक तरुण ना अमेरीका आहे ना जपान आहे. या तरुण तरुणींना चांगल्या शिक्षणाची गरज आहे.  त्यासाठी राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने काम केलं पाहिजे. उद्योगपतींनी देश सोडून जाऊ नये. 10 वर्षानंतर देश म्हातारा व्हायला लागेल. तरुणांकडे मोदींनी लक्ष दिले पाहिजे, अशी माझी अपेक्षा आहे.

मनसेने गुढीपाडवा मेळाव्याचा टीझर काही दिवसांपूर्वी लाँच केला होता. आता सांगण्याची वेळ आली आहे, असं या टीझरमध्ये राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. मनसेने गुढीपाडवा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या आवाजातील एक व्हिडीओ टीझर शेअर केला होता.

गेल्या काही दिवसात आपल्या पक्षाबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. याकडे मी शांतपणे बघत होतो. पण आता या सगळ्यावर बोलण्याची वेळ आली आहे. नक्की काय घडतंय, काय घडवलं जातंय, हे सांगण्याची वेळ आली आहे, असं राज ठाकरे यांनी या टीझर व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

गेले काही दिवसात भाजप-मनसे युतीच्या हालचालींना वेग आल्याचं बोललं जात आहे. मनसे आणि भाजप नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्याचं दिसून आलं. त्यातच राज ठाकरे यांच्या दिल्लीवारीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. यानंतर भाजप आणि मनसे युतीच्या घोषणा होण्याची शक्यता वर्तवल्यात येत होती. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा