राज ठाकरे दिसणार उत्तर भारतीयांच्या मंचावर


SHARE

उत्तर भारतीयांना विरोध करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता उत्तर भारतीयांच्या मंचावर दिसणार आहेत. 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमाचं निमंत्रण राज ठाकरेंनी स्वीकारलं आहे. कांदिवलीच्या भुराभाई हॉलमध्ये हा कार्यक्रम होईल.
उत्तर भारतीय महापंचायतने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात राज ठाकरे प्रमुख वक्ते म्हणून आमंत्रित आहेत. या कार्यक्रमात राज ठाकरे उत्तर भारतीयांशी संवाद साधणार आहेत.


12 ऑक्टोबरला दिलं निमंत्रण

मनसे स्टाईलने अनेकदा उत्तर भारतीयांना दणका देणारे राज ठाकरे आता चक्क उत्तर भारतीयांच्या मंचावर दिसणार आहेत. 2 डिसेंबरला कांदिवलीत होणाऱ्या या कार्यक्रमाचं निमंत्रण 12 ऑक्टोबरला दिल्यानंतर राज यांनी ते स्वीकारल्याची माहिती सूत्रांकडून मिळते.


राज यांनी स्वीकारलं निमंत्रण

परप्रांतीय आणि फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून अनेकदा राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांवर टीका केली आहे. शिवाय यापूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीयांना मारहाणदेखील केली आहे. दरम्यान उत्तर भारतीयांचा एक गट मागच्या महिन्यात राज ठाकरेंना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेला होता. त्यावेळी त्यांनी राज यांना या कार्यक्रमाचं निमंत्रण दिल्यानंतर राज यांनी ते स्वीकारलं आहे. 

संबंधित विषय
ताज्या बातम्या