Advertisement

मनसेच्या ‘या’ नेत्याचा ठाण्यातील कोविड सेंटरला तीव्र विरोध

ज्या शाळा-काॅलेजांमध्ये क्वारंटाईन सेंटर सुरू करण्यात आलं होतं, तिथं जाण्यास विद्यार्थी टाळाटाळ करतील, असं अविनाश जाधव म्हणाले.

मनसेच्या ‘या’ नेत्याचा ठाण्यातील कोविड सेंटरला तीव्र विरोध
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे आणि पालघर जिल्हा प्रमुख अविनाश जाधव यांनी ठाण्यातील शाळा-काॅलेजांमध्ये कोविड १९ सेंटर (Corona Care Centres) सुरू करण्यास तीव्र विरोध केला आहे. यावरून ठाणे महापालिकेतील सत्ताधारी पक्ष आणि मनसेमध्ये जुंपण्याची शक्यता आहे.

ठाण्यामध्ये काेरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ठाण्यात ठिकठिकाणी असलेल्या शाळा आणि काॅलेजांमध्ये कोविड १९ सेंटर सुरू करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने नुकताच घेतला आहे. प्रभाग समितीतंर्गत महापालिकेच्या शाळा क्वारंटाईन सेंटर्ससाठी वापरण्यात याव्यात अशा सूचना ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिल्याचं स्पष्ट केलं. 

घरोघरी ताप सर्वेक्षण प्रभावीपणे करण्याबरोबरच कॅान्टॅक्ट ट्रेसिंगच्या कामाला प्राधान्य देण्याच्या सूचना, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी घरोघरी पल्स ॲाक्सीमीटर, थर्मल स्कॅनरच्या माध्यमातून ताप सर्वेक्षण करण्याची गरज असून  ताप सदृष्य/कोरोना सदृष्य लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना तात्काळ क्वारंटाईन सेंटरमध्ये स्थलातंरित करावे, फिव्हर ओपीडी व कॅान्टॅक्ट ट्रेसींगला प्राधान्य द्यावं, मिशन बिगिन अगेन अंतर्गत बाजारपेठा उघडण्यात आल्या असून पी1/पी2 प्रमाणे कार्यवाही होते की नाही याची पोलिसांशी समन्वय साधून त्याची प्रभावीपणे अंमलबजाणी करावी व प्रभाग समितीतंर्गत महापालिकेच्या शाळा क्वारंटाईन सेंटर्ससाठी वापरण्यात याव्यात अशा सूचनाही आयुक्तांनी केल्या आहेत.

हेही वाचा - राज ठाकरे यांच्या कृष्णकुंजपर्यंत पोहोचला कोरोना... पण,

परंतु ठाणे महापालिकेच्या या निर्णयावर मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात बोलताना अविनाश जाधव म्हणाले की, ठाण्यातील शाळा आणि काॅलेजांमध्ये क्वारंटाईन सेंटर सुरू करण्याचा ठाणे महापालिकेचा निर्णय चुकीचा आहे. यामागचं कारण म्हणजे काही दिवसांनी शाळा-काॅलेज सुरू होतील. तेव्हा ज्या ज्या शाळा-काॅलेजांमध्ये क्वारंटाईन सेंटर सुरू करण्यात आलं होतं, तिथं जाण्यास विद्यार्थी टाळाटाळ करतील. संबंधित ठिकाणी कोरोनाच्या रुग्णांना ठेवण्यात आलेलं असल्याने विद्यार्थ्यांच्या मनात कोरोनाविषयीची भीती कायम असेल. विद्यार्थ्यांनी मोकळ्या वातावरणात अभ्यास करणं अपेक्षित आहे. त्याऐवजी महापालिकेने नियमानुसार शहरातील खासगी रुग्णालयातील ८० टक्के बेड ताब्यात घेऊन तिथं कोरोनाग्रस्तांनी आधी सोय केली पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

एका बाजूला मुंबईतील स्थिती बिघडत असताना ठाण्यातील कोरोनाबाधितांचा आकडा देखील वाढतच चालला आहे. आतापर्यंत ६९९८ कोरोनाग्रस्त ठाण्यात आढळून आले आहेत. त्यापैकी २१६३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर १४५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा