शिवाजी महाराजांच्या स्मारकाला मच्छीमारांचा विरोध


  • शिवाजी महाराजांच्या स्मारकाला मच्छीमारांचा विरोध
SHARE

कफ परेड - मुंबईजवळ अरबी समुद्रात होणाऱ्या शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन 24 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. त्यादिवशी स्मारकाच्या जागेला विरोध करण्यासाठी मुंबईतल्या सर्व मच्छीमार संघटना एकवटल्या आहेत. 24 तारखेला गिरगाव चौपाटीवरील मत्स्यालय कार्यालयाच्या समोर उभे राहून कोळी बांधव काळे झेंडे दाखवून निदर्शनं करणार आहेत.

कफ परेडच्या मच्छीमार कॉलनीत सोमवारी एक बैठक झाली. आंदोलनाची रुपरेषा ठरवण्यासाठी सर्व मच्छीमार संघटना आणि कोळी बांधव या बैठकीत सहभागी झाले होते. या वेळी महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या वतीनं सर्व संघटनांनी एकमतानं पंतप्रधानांसमोर काळे झेंडे दाखवून निदर्शनं करण्याचा निर्णय घेण्यात आला. शासनानं शिवाजी महाराजांचं स्मारक बांधण्यासाठी राज्यात पुन्हा एकदा जनमत चाचणी करावी, अशी मागणी या वेळी मच्छीमार बांधवांनी केली.
आंदोलनाचं स्वरूप
मुंबईतील सर्व कोळी बांधव गिरगाव चौपाटीवरील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला हार घालून आंदोलनाला सुरुवात करतील. त्यानंतर महाराष्ट्र कृती समितीचे अध्यक्ष किरण कोळी आणि कार्यध्यक्ष निगो कॉलोसो हे समुद्रातील पाण्याने आंघोळ करून मत्सालय मुख्यालयाबाहेर आंदोलनाला बसतील. त्यांनंतर सर्व कोळी बांधव राज भवनासमोर आंदोलन करणार आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या