Advertisement

जांबोरी मैदान तो झांकी है पिक्चर अभी बाकी है : आशिष शेलार

माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील जांबोरी मैदानात दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे.

जांबोरी मैदान तो झांकी है पिक्चर अभी बाकी है : आशिष शेलार
SHARES

माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील जांबोरी मैदानात दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. एकप्रकारे भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी शिवसेनेला धक्का दिला आहे.

जांबोरी मैदान आरक्षित झाले नसल्याचे हेरून भाजपने १०-१२ दिवसांपूर्वी ते आरक्षित केले. मुंबई भाजप अध्यक्षपदी अ‍ॅड. आशीष शेलार यांची नियुक्ती नुकतीच झाली असून त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघावर विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.

त्यामुळे त्यांनी आधीच भाजप पदाधिकारी संतोष पांडे यांना सूचना देऊन मैदानाचे आरक्षण करून दहीहंडीचे आयोजन केले. आम्ही मुंबई महानगरपालिका, पोलीस आणि अन्य सर्व परवानग्या मिळविल्या आहेत, असे पांडे यांनी सांगितले.

महापालिकेतील भ्रष्टाचारमुक्तीची ही दहीहंडी असल्याने आम्ही बक्षिसाची रक्कम अद्याप ठरविलेली नाही, मात्र ती फोडणाऱ्या गोविंदांचा यथोचित सन्मान केला जाईल, अशी माहितीही पांडे यांनी दिली.

वरळी हा शिवसेनेचा गड आहे हे आम्ही मानत नाही. आदित्य ठाकरे हे युतीतून निवडून आले आहेत. त्यामुळे गड वगैरे मानायचा प्रश्नच येत नाही. कुणाचा कोणता गड आहे हे शेलार मामांशिवाय कोण ठरवू शकतं? असं सांगतानाच जांबोरी मैदान तो झांकी है पिक्चर अभी बाकी है, असं आशिष शेलार म्हणाले.

जांबोरी मैदानात भाजपने दहीहंडी आयोजित केल्याने त्यावर शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांनी टीका केली आहे. भाजपचे वरळीतील दहीहंडीचे आयोजन हा बालिशपणा आहे. मैदानाची दुर्दशा होऊ नये म्हणून आम्ही तिथे नियोजन केलं नाही. जांबोरी मैदानासाठी पालिकेने अडीच कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे मैदानाची वाताहात होऊ नये ही आमची भूमिका होती. आम्ही दहीहंडी साजरी करणार आहोत. पण दुसरं मैदान शोधत आहोत, असं सांगतानाच वरळीशी शिवसेनेचे घट्टं नातं आहे. गोविंदा असो किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून प्रयत्न केले तरी वरळी शिवसेनेपासून तुटणार नाही. सध्या भाजपचे सुरू असलेले दहीहंडी आयोजनाचे प्रयत्न बालिश आहेत, असा टोला सुनील शिंदे यांनी लगावला.



हेही वाचा

“50 खोके एकदम ओके!”, विरोधक शिंदे गटाविरोधात आक्रमक

फोनवर 'हॅलो' ऐवजी 'वंदे मातरम' बोला, महाराष्ट्र सरकराचे आवाहन

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा