Advertisement

“50 खोके एकदम ओके!”, विरोधक शिंदे गटाविरोधात आक्रमक

राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशानाला आजपासून सुरुवात झाली. अधिवेशनाचा पहिलाच दिवस चांगलाच वादळी ठरला.

“50 खोके एकदम ओके!”, विरोधक शिंदे गटाविरोधात आक्रमक
SHARES

राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशानाला आजपासून सुरुवात झाली. अधिवेशनाचा पहिलाच दिवस चांगलाच वादळी ठरला. विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसून ईडी सरकार हाय हाय, स्थगिती सरकार हाय हाय अशा घोषणाबाजी करत शिंदे-फडणवीस सरकारचा जोरदार निषेध केला.

“50 खोके एकदम ओके!”,”रोक घेऊन ओके झालेल्या सरकारचा धिक्कार असो!”,”सुधीरभाऊंना चांगलं खातं न सरकारचा धिक्कार असो!”, अश्या घोषणा देण्यात आल्या. या घोषणांनी विधिमंडळ परिसर दुमदुमुन गेला होता.

यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी यावेळी सरकारचा निषेध केला. “आले रे आले गद्दार आले”, असं म्हणत त्यांनी शिंदे गटाला टोला लगावला.

विरोधकांनी केलेल्या या निषेध आंदोलनात राष्ट्रवादी नेते, परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी खमक्या आवाजात सरकारविरोधात घोषणा दिल्या… “ईडी सरकार हाय हाय… शेतकऱ्याला मदत न करणाऱ्या सरकारचा निषेध असो! ओला दुष्काळ जाहीर न करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो” अश्या घोषणा देण्यात आल्या. “सुधीरभाऊंना चांगलं खातं न सरकारचा धिक्कार असो!” आशिष शेलारांवर अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अश्या घोषणा त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी अदित्य ठाकरे म्हणाले की,"आम्ही लोकशाहीचा खून करणाऱ्यांच्याविरोधात उभे आहोत. हे गद्दार सरकार आहे, ते कोसळणार म्हणजे कोसळणारच. हे घटनाबाह्य सरकार आहे, बेकायदेशीर सरकार आहे, बेईमानांचं सरकार आहे.हेही वाचा

विनायक मेटे अपघातासंदर्भात धक्कादायक माहिती उघड, कॉल रेकॉर्ड होतोय व्हायरल

आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय लता मंगेशकरांच्या जयंती दिनी सुरू होणार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा