Advertisement

विनायक मेटे अपघातासंदर्भात धक्कादायक माहिती उघड, कॉल रेकॉर्ड होतोय व्हायरल

विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर एक कॉल रेकॉर्डिंग (Call recording viral) व्हायरल होत आहे.

विनायक मेटे अपघातासंदर्भात धक्कादायक माहिती उघड, कॉल रेकॉर्ड होतोय व्हायरल
SHARES

शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक विनायक मेटे (vinayak mete death case) यांच्या अपघाती मृत्यूनंतर एक कॉल रेकॉर्डिंग (Call recording viral) व्हायरल होत आहे. या कॉल रेकॉर्डिंगमधील संभाषणानुसार 3 ऑगस्टला मुंबईकडे जात असताना शिक्रापूरपासून दोन किलोमीटर अंतरापर्यंत दोन गाड्यांनी पाठलाग करत होत्या, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

विनायक मेटे यांच्या सहकाऱ्याचा फोन रेकॉर्ड कॉल व्हायरल झाला आहे. अण्णासाहेब मायकर असं त्यांचं नाव आहे. अण्णासाहेब मायकर हे 3 ऑगस्टला मेटे यांच्यासोबतच प्रवास करत होते.

शिक्रापूरजवळ एक गाव होतं. तिथे अडीच किलोमिटरपर्यंत आमचा पाठलाग करण्यात आला होता. ती गाडी मागे येत होती, पुढे जात होती. रात्री हा प्रकार घडला होता. या गाडीतील माणसं आम्हाला हात दाखवत होती. आम्ही गाडी थांबवून चौकशी करणार होतो, त्यावेळी मेटे साहेबांनी गाडीचा नंबर घेऊन ठेव, असं सांगितलं.

मायकर म्हणाले की, बीडमधून मुंबईला निघालो होतो. रात्री 11.30 वाजता शिक्रापूरजवळ पोहोचलो होतो. एक गाडी आमचा पाठलाग करत होती. समोर आयशर ट्रक होता. त्या गाडीतली माणसं आम्हाला हात करून गाडी थांबवण्यासाठी इशारा करत होते. पण, मेटे साहेबांनी गाडी थांबवण्यास नकार दिला, गाडी आयशर ट्रकच्या मागेच ठेवण्यास सांगितले होते. पुढे एक छोटे गाव आलं, तिथे या गाडीने आमच्या गाडीला जोरात कट मारला आणि निघून गेले. मग आम्ही आयशर ट्रकला मागे टाकून पुढे निघून गेलो, अशी माहिती मायकर यांनी दिली.

जी गाडी आमचा पाठलाग करत होती, त्यामध्ये पाठीमागे एक जण बसलेला होता. तर पुढच्या सीटवर एक जण बसलेला होता. ड्रायव्हर मिळून अशी तीन माणसं त्या गाडीमध्ये होती, असंही मायकर यांनी सांगितलं.

या घटनेनंतर आम्ही दुसऱ्या दिवशी मेटे यांच्या भाच्याला सांगितलं होतं. त्यांचा दुसरा ड्रायव्हर मोरे यांना सांगितलं होतं. या संपूर्ण प्रकारामध्ये ड्रायव्हर समाधान मोरे आणि त्यांचा अंगरक्षक सुद्धा साक्षीदार होता, असंही मायकर यांनी सांगितलं.



हेही वाचा

फोनवर 'हॅलो' ऐवजी 'वंदे मातरम' बोला, महाराष्ट्र सरकराचे आवाहन

राज्य मंत्रिमंडळ खातेवाटप, राष्ट्रवादीची खाती भाजपाकडे, तर शिंदे गटाला काय?

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा